औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल 96.33 निकाल टक्के

औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल 96.33 निकाल टक्के

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. निकालात औरंगाबाद विभाग राज्यात नवव्या स्थानावर असून विभागाचा निकाल 96.33टक्के एवढा आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये कोकण विभाग पहिल्या स्थानावर असुन औरंगाबाद विभाग राज्यात नवव्या स्थानावर आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यंदा राज्यात १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्यात आली नव्हती. पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी १६लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८लाख ८९हजार ५०६ मुलं असून मुलींची संख्या ७लाख ४९ हजार ४५८  एवढी आहे.

विभागातील जिल्हानिहाय निकाल

औरंगाबाद- ९७.०१ टक्के
बीड  – ९७.०१ टक्के
परभणी-९५.३७ टक्के
जालना- ९५.४४ टक्के
हिंगोली-९४.७७ टक्के

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news