नांदेड : बांधकाम व्यावसयिक संजय बियाणी हत्याप्रकरणी सहा आराेपी अटकेत

नांदेड : संजय बियाणी हत्याकांडातील सहा आरोपी अटकेत
नांदेड : संजय बियाणी हत्याकांडातील सहा आरोपी अटकेत

नांदेड , पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध बांधकाम व्यावसयिक संजय बियाणी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल चार देशांशी पत्रव्यवहार केला होता, तर सात राज्यांत तपास करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पाेलीस कोठडी दिली आहे.

५ एप्रिल रोजी बियाणी यांची हत्या झाली हाेती. या घटनेनंतर नांदेडसह संपूर्ण राज्य अक्षरशः ढवळून निघाले. बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात हरविंदरसिंघ संधू ऊर्फ रिंदा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला होता. आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली होती. घटनेनंतर एक-एक कडी जोडत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.

इंदरपालसिंघ ऊर्फ सनी तिरतसिंघ मेजर, मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे, सतनामसिंघ ऊर्फ सना दलबिरसिंघ शेरगिल, हरदीपसिंघ ऊर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंघ वाजवा, गुरमुखसिंघ ऊर्फ गुरी सेवकसिंघ गिल आणि करणजितसिंघ रघबिरसिंघ साहू या आराेपींना अटक करण्‍यात आली आहे.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीचे प्रमुख व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली आदींसह अन्य कर्मचार्‍यांनी कामगिरी यशस्वी केली. बियाणी यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही आरोपी लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास निसार तांबोळी यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news