‘खून का बदला खून’ : मुसेवालांच्‍या मारेकर्‍यांना बवाना गँगची धमकी ; पंजाबमध्‍ये उडणार गँगवॉरचा भडका | पुढारी

'खून का बदला खून' : मुसेवालांच्‍या मारेकर्‍यांना बवाना गँगची धमकी ; पंजाबमध्‍ये उडणार गँगवॉरचा भडका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्‍या हत्‍येनंतर पंजाबमध्‍ये पुन्‍हा एकदा गँगवॉरचा भडका उडण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. मूसेवाला यांच्‍या मारेकर्‍यांचा ४८ तासांमध्‍ये खात्‍मा करणार, अशी धमकी बवाना गँगने सोशल मीडियावर दिल्‍याने खळबळ उडाली आहे.

कोण आहे नीरज बवाना?

नीरज बवाना हा दिल्‍ली येथील रहिवासी आहे. दरोडा, लूटमार, खंडणी प्रकणी त्‍याच्‍यावर गुन्‍हे दाखल आहेत. सध्‍या तो तिहार कारागृहात आहे. कारागृहातूनच तो गुन्‍हेगारी कारवाया करत असल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. नीरज बवाना यांच्‍या गॅगमध्‍ये हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील गुंड आहे. दिल्‍लीत गँगस्‍टर नीतू दाबोदा हा चकमकीत ठार झाला. यानंतर नीजर बवाना याचे गुन्‍हेगारी जगतामधील प्रस्‍थ वाढले.

पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बरार याने स्वीकारली आहे. गोल्डीचा म्‍होरक्‍या आणि तिहार जेलची हवा खात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने मूसेवाला यांची हत्या घडवून आणल्‍याचे त्‍याने म्‍हटलं आहे. बवाना गँग बरोबरच बंबीहा गँगनेही लॉरेंस गँगच्‍या गुंडाचा खात्‍मा करणारा अशी धमकी दिली आहे.

बिश्नोई यानेच तुरुगांतून मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याची कबुली गोल्‍डी याने दिली आहे. बिश्नोईचे दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांत गुन्हेगारीचे जाळे पसरले आहे. बिश्नोई आधी विद्यार्थी चळवळीत कार्यरत होता नंतर त्याने वाहने चोरी सारखे गुन्हे सुरू केले. बिश्नोईच्या गँगमध्ये ७०० च्यावर गुंड आहेत. बिश्नोईने एकदा सलमान खानला ठार करू जाहीर धमकी दिली होती. राजस्थानमधील गँगस्टर आनंदपाल सिंग पोलीस कारवाईत मारला गेला, त्यानंतर सिंग याच्या टोळीतील अनेक गुंड बिश्नोई टोळीत सामील झालेहोते. आता मुसेवाला यांच्‍या हत्‍यनंतर पंजाबमध्‍ये गँगवॉरचा भडका उडण्‍याची शक्‍यता आहे.

हेही वाचा :

 

 

 

 

Back to top button