अहंकार सोडला तोच विजयी झाला : संजय राऊत यांचा भाजपला टोला | पुढारी

अहंकार सोडला तोच विजयी झाला : संजय राऊत यांचा भाजपला टोला

पुढारी ऑनलाईन : अहंकार सोडा हा गौतम बुद्धांचा संदेश आहे. त्यांच्या आदेशाचं सर्वांनी पालन केले पाहिजे. ज्याने अहंकार सोडला तोच विजयी झाला, असा टोला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपला लगावला.

पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी बाेलताना राऊत म्‍हणाले की, शिवसेनेने आजवर अनेक वादळे पाहिली आहेत.  वादळात टिकून राहिलो म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे आशीर्वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. पुण्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

हेही वाचलंत का?

Back to top button