औरंगाबाद : पोलीस आयुक्तांचा शहरावर कंट्रोल नाही; माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा आरोप | पुढारी

औरंगाबाद : पोलीस आयुक्तांचा शहरावर कंट्रोल नाही; माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा आरोप

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. त्याकडे आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्या कारणाने अशा गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने बुधवारी (दि.२५) पोलीस आयुक्तालयात आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी तिन्ही डीसीपींची बैठक घेत या विषयावर चर्चा केली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना खैरे महणाले, शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांचे शहरावर कंट्रोल नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणत गुन्हे घडत आहेत. त्यांना ठाण्यातील सर्व गोष्टी माहिती होतच नसल्याचा आरोप खा. चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला आहे.

Back to top button