

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने महिलेवर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने अंबड पोलिस ठाण्यात संशयित रमेश कांतीलाल कामडी (32, रा. करंजळी, ता. पेठ) याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयिताने जानेवारी 2019 पासून मे 2022 दरम्यान, वारंवार अत्याचार केले व जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.