हिंगोली : औंढा नागनाथ तलावात मच्छीमाराचा जाळ्यात अडकून मृत्यू | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ तलावात मच्छीमाराचा जाळ्यात अडकून मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : औंढा नागनाथ तलावात मच्छिमाराचा जाळ्यात अडकून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.24) दुपारी घडली आहे. नागनाथ तलावात अनेक वर्षापासून मत्स्य व्यवसाय केला जातो. जवळपास पन्नास एकरवर असलेल्या तलावात मंगळवारी (दि.24) सकाळी सहा वाजल्यापासून तलावात जळे टाकण्यात आले होते.

मच्छीमार विठ्ठल लक्ष्मण सुरदुसे (वय 49 रा. भोई गल्ली औंढा नागनाथ) हा टाकलेल्या जाळ्याला मस्त्य लागला की नाही हे पाहण्यासाठी तलावात गेला होता. अचानक जाळ्याला अडकून बुडाला. त्याचे सहकारी त्या ठिकाणी गेले असता विठ्ठल सुरजदूसे हा तलावात तरंगत असताना दिसून आला. यानंतर बुडालेल्या सुरजदूसेला मच्छीमा-यांनी तलावाच्या बाहेर काढले. सहकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button