औरंगाबाद : कामावरून सतत टोमणे मारणाऱ्या सासूचा सुनेनं मुडदा पाडला | पुढारी

औरंगाबाद : कामावरून सतत टोमणे मारणाऱ्या सासूचा सुनेनं मुडदा पाडला

पैठण : पुढारी वृत्तसेवा : घरातील कामे करूनही सतत टोमणे मारून वाद निर्माण करणाऱ्या सासूचा सुनेने लाकडाचा दांडा डोक्यात घालून खून केला. ही घटना बुधवारी (दि. २७) सकाळी साडे नऊच्या सुमारास पाटेगाव (ता. पैठण) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ४८) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. या प्रकरणी कांचना गणेश हरवणे (वय ३५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, पैठणपासून जवळ असलेल्या पाटेगाव परिसरातील दादेगाव रोडवरील हरवणे शेती वस्तीवर कौसाबाई हरवणे कुटुंबासह राहतात. बुधवारी सकाळी घरातील कामावरून कौसाबाई आणि सून कांचना यांच्यामध्ये वाद झाला. तू व्यवस्थित घरातील कामे करत नाहीस, असे कौसाबाई सुनेला म्हणाल्या. त्यानंतर संतप्त झालेल्या सूनेने सासूला लाकडाच्या दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सासूच्या डोक्यावर जबरी मारहाण झाल्याने मोठी दुखापत झाली. आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

ही घटना घरातील एका छोट्या मुलीने दुसऱ्या वस्तीवर जाऊन आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यांनी तत्काळ जखमी कौसाबाई यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, बीट जमादार चैडे, भागिले, सचिन भुमे, सुनील कानडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आणि आरोपी सुनेला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button