पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका; म्हणाल्या, ‘चुकून झालेला विजय महागात पडणार’

पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका; म्हणाल्या, ‘चुकून झालेला विजय महागात पडणार’

धारूर (बीड); पुढारी वृत्तसेवा : परळीत माझा फार्म हाऊस नाही, माझा महाल नाही. परळीत ज्यांचा विजय चुकून झाला, त्यांना तो विजय महागात पडणार आहे, अशा सडेतोड शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. त्या धारूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.

बीड जिल्ह्यातील धारूर येथे बुधवारी (दि.22) दुपारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, राज्याच्या राजकारनात आज जी सर्कस सुरू आहे त्या सर्कशीत आपण नाही. परंतु, ती सर्कस बाहेरून पाहायला येते असे म्हणत त्यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

ज्या दिवशी माझ्याकडून जिल्ह्याची बदनाम होईल तो माझ्यासाठी शेवटचा श्वास असेल. स्वर्गातही गोपीनाथ मुंडे यांची मान खाली जाणार नाही, मी मी म्हणणारे अहंकारी नेतृत्व महाराष्टाला नको तर जनता जनता म्हणणारे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे. आमच्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून पुन्हा आम्ही कामाला लागलो आहोत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे, त्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

अधीक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news