धनंजय मुंडे परभणी, तर प्राजक्त तनपुरे गोंदियाचे नुतन पालकमंत्री; अखेर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा | पुढारी

धनंजय मुंडे परभणी, तर प्राजक्त तनपुरे गोंदियाचे नुतन पालकमंत्री; अखेर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे नवाब मलिक अटकेत असल्याने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोंदियाच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे होती. मात्र त्यांना ईडीकडून अटकेची कारवाई झाल्याने परभणी आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. ती जबाबदारी आता धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

नबाव मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यांच्याकडे असलेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली. तर अल्पसंख्याक मंत्रीपद गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री झाले आहेत.

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दरम्यान, नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ॉत्यांचा आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम ४ एप्रिलपर्यंत वाढला आहे. दरम्यान, न्यायालयाने मलिक यांना कोठडीत बेड आणि खुर्ची देण्यास परवानगीही देण्यात आली आहे.

दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी मलिक यांना २३ फेब्रुवारीरोजी ईडीने आठ तास चौकशी केली. त्यानंतर त्‍यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्‍यात आली होती. यानंतरही त्‍यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, नवाब मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे त्यांना आज सत्र न्यायालयात हजर केले असता सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button