बीड : केजमध्ये एकाचा अपहरण करून खून

File Photo
File Photo

गौतम बचुटे/केज, पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील एकाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अपहरण झालेल्‍या व्यक्‍तीचे नाव सुधाकर चाळक आहे. याच्या खून करून त्याचे शीर धडावेगळे करून ते नदीत फेकले. त्या घटनेतील आरोपी तुकाराम मुंडे, रमेश मुंडे, दत्तात्रय हिंदुराव देसाई, पवन देसाई आणि रमेश कोकनूरकर या पाच आरोपींची दि. २२ मार्च रोजी पोलीस कोठडी संपली.

त्‍यानंतर आज त्यांना केज न्यायालयासमोर सुनावली हजर करण्यात आले होते. यावेळी केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश संकपाळे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेचा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील यांनी तपास केला.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news