गेवराई : वाळूच्या केनिमुळे एकाचा बळी; राक्षसभुवन येथील घटना | पुढारी

गेवराई : वाळूच्या केनिमुळे एकाचा बळी; राक्षसभुवन येथील घटना

गेवराई, (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत, ते बंद होण्याचे नाव घेत नाहीत आणि त्यातली त्यात अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक कधी बंद होणार? असा नागरिकांचा सवाल असून आज च्या घटनेने पुन्हा एक बळी गेला असून अनाधिकृत वाळू उपसा काही बंद होण्याचे नाव घेईना अनेक कार्यवाई केल्या तरी देखील वाळू उपसा सुरूच आहे.

याच ज्या केनिच्या साह्याने वाळू उपसा केला जातो त्या केनिवर काम करणाऱ्या एका तरूण मजूरांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे सदर ठिकाणावरूण या तरुणाचा मृत्यूदेह उमापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात टाकून आरोपींनी मात्र पलायन केले असल्याची माहिती आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की , राजेंद्र विक्रम काळे ( वय ३१ वर्ष ) राहनार खेर्डा तालुका पैठण जिल्हा औंरगाबाद असे या मयत तरूणाचे नाव असुन हा तरूण वाळू उपसा करण्याच्या केनिचा मजूर असल्याची माहिती आहे या केनिवर वाळू उपसा करतांना त्यांचे वायरहूक तुटून त्यांच्या डोक्यावर गंभीर ईजा झाली त्यानंतर तो गोदापात्राच्या खड्यात पडला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

तसेच, मयत झाल्यानंतर त्या तरूणाचा मृत्यूदेह उमापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून आरोपीनी पलायन केले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे घटनेची माहिती मिळताच तहसिलदार सचिन खाडे , चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी घटनास्तळावर धाव घेतली आहे . तसेच या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल . असे तहसिलदार सचिन खाडे यांनी सांगितले आहे .

प्रकरण दडपण्यासाठी वाळू तस्करांची दगडी फिल्डिंग ..!

राक्षसभूवनच्या एका वाळू तस्करांच्या वाळुच्या केनिवर सदर मजूर काम करायचा याचां मृत्यू झाला हे प्रकरण दडपण्याची वाळू माफियांनी तगडी फिल्डिंग लावली आहे उमापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर मोठी वाळू तस्करांची गर्दी जमा झाली होती .दरम्यान या प्ररकरणी कोणावर कार्यवाई केली जाते व कोणला वाचवले जाते हे लवरकच स्पष्ट होईल

हे ही वाचलं का  

Back to top button