बचत गटांना लाखोंचा गंडा | पुढारी

बचत गटांना लाखोंचा गंडा

चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली एकाला अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिला बचत गट व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. तसेच, प्रधानमंत्री विमा योजनेच्या नावाने कोरोनाग्रस्त मयतांच्या कुटुंबियांना बनावट फॉर्म देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार 50 रुपये घेऊन 182 जणांना गंडा घातला.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शहापूर टोलनाका येथे सापळा रचून एकाला अटक केली आहे.

‘युनिक लँड आयडेंटिफिकेशन नंबर’ला चाकणपासून प्रारंभ

विकास रघुनाथ बांदल (वय 35, रा. नर्‍हे, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विलास वामन पाटील (रा. खराळवाडी, पिंपरी) याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात 24 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास बांदल याने तिरुपती कार्पोरेशन अँड जीवन संजीवन ग्रुप संस्थेची स्थापना करून आकुर्डी येथे मे ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून काही जणांशी संपर्क साधला.

स्वाभिमानी फायनान्समार्फत आठ महिला बचत गटांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रत्येक गटाकडून 46 हजार 800 असे एकूण तीन लाख 74 हजार 400 रुपये घेतले.

अभिनेत्री जया बच्चन यांना कोरोनाची लागण

तसेच वैयक्तिक कर्ज मंजूर करून देतो, असे 21 जणांना सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एक लाख पाच हजार रुपये घेतले.

त्या 21 जणांमधील सात जणांकडून कर्ज मंजुरीच्या प्रोसेससाठी तीन लाख 86 हजार 90 रुपये, असे एकूण आठ लाख 65 हजार 490 रुपये घेतले.

त्यानंतर कर्ज मंजूर करून न देता बचत गटातील महिला, विद्यार्थी व स्वाभिमानी फायनान्स यांची फसवणूक केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह बातमी! Sensex १ लाखापर्यंत झेप घेईल, ‘या’ तज्ज्ञाचे मोठे भाकित

या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आरोपी विकास बांदल याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी 27 जानेवारीला शहापूर टोलनाका येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच चारचाकी वाहन व काही कागदपत्रे देखील जप्त केले आहेत. पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ, सहायक निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक समीर दाभाडे, मंजुषा शेलार, पोलिस कर्मचारी प्रमोद लांडे, सुनील गवारी, अमित गायकवाड, सचिन रावते, संतोष चांदणे, भास्कर दिघे, माधुरी उगले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

६ धावा काढून विराट मोडणार सचिन तेंडूलकरचा ‘हा’ विक्रम!

फसवणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण इन्शुरन्स कोविड-19’ या योजनेची माहिती देऊन त्याचे बनावट फॉर्म तयार करून आरोपी बांदल याने ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या कुटुंबियांकडून प्रत्येकी एक हजार 50 रुपये घेतले. अशा पद्धतीने 182 लोकांची आरोपीने फसवणूक केली.

नाशिक : हद्दपार का करण्यात येऊ नये? त्या पाचही जणांना कारणे दाखवा नोटीस

धुळे येथे थाटले कार्यालय

आरोपी बांदल याने नर्‍हे आंबेगाव, पुणे येथे तिरुपती कॉर्पोरेशन अँड जीवन संजीवन ग्रुप संस्थेच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील लोकांची फसवणूक करून कार्यालय बंद केले.

त्यानंतर धुळे येथे कार्यालय सुरू करून संस्थेमध्ये काम करण्यासाठी काही जणांना ऑफर लेटर दिल्याच्या तपासामध्ये आढळून आले. आरोपी बांदल याच्याविरोधात यापूर्वी खेड व विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार आहे.

 

 

Back to top button