नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपचा नवा मोंढा पोलिस ठाण्यात ठिय्या | पुढारी

नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपचा नवा मोंढा पोलिस ठाण्यात ठिय्या

परभणी : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा व मारण्याची धमकी देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १८) नवा मोंढा पोलिस ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी आंचल गोयल व पोलिस अधीक्षक जयंत मिना यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश कार्यकारीणी सदस्य संजय शेळके, मोहन कुलकर्णी, मनपाच्या गटनेत्या मंगल मुदगलकर, नगरसेवक मोकिंद खिल्लारे, सरचिटणीस संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, एस. एस. ईनामदार, अंकुश अवरगंड, अब्दुल खालेद, संतोष जाधव, रामदास पवार, उमेश शेळके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, रोहीत जगदाळे, युवती मोर्चा संयोजिका गिता सुर्यवंशी, संजय जोशी, अरूण कदम, संदीप शिंदे आदी सहभागी झाले होते.

पटोले यांनी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्दांत भावना व्यक्‍त केल्या. त्यांचे हे वक्तव्य देशवासियांच्या भावनांना ठेच पोचविणारे आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असणार्‍या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य केल्या प्रकरणी पटोली यांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचलं का?

वाशिममध्‍ये भाजपकडून तीव्र निषेध

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यचे आज वाशिम तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपा कार्यकर्त्यांनीना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी वाशिम शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Back to top button