

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरी येथे एका अनोळखी तरुणाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी (दि. १७) रात्री उशिरा उघडकीस आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. तसेच, ओळख पटू नये, यासाठी आरोपींनी तरुणाच्या चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी परिसरात चौकशी केली. मात्र, तरुणाची ओळख पटू शकली नाही. मात्र, काही संदर्भ मिळाले असून त्यानुसार तपास सुरू असल्याचे भास्कर जाधव यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
https://youtu.be/vlPdr8tWrUo