बामणोली : कुसुंबी मुरा पठारावर 'सौंदयाने' गवत कापणी सुरू - पुढारी

बामणोली : कुसुंबी मुरा पठारावर 'सौंदयाने' गवत कापणी सुरू

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसा स्थळ कास पुष्प पठारालगत असणाऱ्या कुसुंबी मुरा पठारावर ‘सौंदयाने’ गवत कापणी सुरू. अलीकडच्या काळात शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करू लागला आहे. मात्र जावली तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या भागात व डोंगर माथ्यावर वसलेल्या वाडी वस्तीवर आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते.

कुसुंबी मुरा पठारावर सौंदयाने गवत कापणी

याचाच एक भाग म्हणून कुसुंबी मुरा पठारावर सौंदयाने गवत कापणी सुरू. या परिसरातील शेतकरी एकत्र येत ढोल थाळा खर्डीकीच्या तालावर सौंदा करून गवत कापणी करतात. एकमेंकाच्या मदतीने ही गवत कापणी सुरू असल्याने एक वेगळीच मजा यानिमित्ताने येत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. यानिमित्ताने अजूनही ग्रामीण भागात एकी असल्याचे यानिमित्ताने दर्शन झाल्याचे पहावयास मिळत आहे. अलीकडच्या काळात सामुदायिक शेती हा प्रकार माणूस विसरला असला तरी डोंगरमाथ्यावर वसलेल्या मुऱ्यावरील लोक आजही सामुदायिक शेती करत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button