चक्रवाक बदकांच्या आगमनाने ‘उजनी’ जलाशयाचे साैंदर्य दुणावले | पुढारी

चक्रवाक बदकांच्या आगमनाने ‘उजनी’ जलाशयाचे साैंदर्य दुणावले

पळसदेव : लडाख, नेपाळ, अफगाणिस्तान, मंगोलिया या ठिकाणी वास्तव्याला असणार्‍या आणखी काही मनमोहक स्थलांतरित चक्रवाक बदकांचे उजनी परिसरात आगमन झाले आहे.

bullock cart races in Maharashtra : सर्वोच्‍च न्‍यायालयाची बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी

उजनी धरणातील विशेष आकर्षण असलेल्या रोहित व पट्टकदंब हंसांच्या आगमनानंतर चक्रवाक बदकांच्या आगमनामुळे उजनीच्या पक्षिवैभवात भर पडली आहे. टाडोर्ना पेरुगिनिया असे शास्त्रीय नाव असलेल्या हंस गणातील या बदकाला इंग्रजीत ब्रह्मणी डक तसेच रूढी शेल्डक या नावाने ओळखतात.

‘नासा’च्या यानाचा सूर्याला ‘स्पर्श’!

ब्राह्मणी बदक, चकवा चकवी व सोनेरी बदक, अशी मराठीतील नावे या विदेशी बदकाला आहेत. संपूर्ण अंगावर बदामी किंवा भगव्या रंगाचा सोनेरी पिसे असलेल्या या बदकाचे डोके व मान केतकी रंगाचे आहे. शेपटी काळ्या रंगाची असते. ही बदके नेहमीच्या बदकांपेक्षा आकाराने मोठी असतात. जोडी करून वावरणार्‍या नर व मादी बदकांमध्ये फारसा फरक आढळत नाही. मात्र, बारकाईने निरीक्षण केल्यास नराच्या गळ्यातील काळ्या पट्टीमुळे नर ओळखता येतो.

हेही वाचा

हायप्रोफाइल शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जी म्हणतेय ‘ती जिवंत आहे’

Omicron variant : ओमायक्रॉन हवेतून वेगाने पसरतो, पण फुफ्फुसाला संसर्गाचा धोका कमी, नव्या संशोधनातील माहिती

विदिशा श्रीवास्तव : काशीबाई बाजीराव बल्लाळ फेम अभिनेत्री इतकी ग्लॅमरस

ठरलं..! मनसेच्या रूपाली पाटील जाणार राष्ट्रवादीच्या तंबूत

पुणे शहराला सापडेना सक्षम नेता

Back to top button