कोल्‍हापूर : विवेकानंद कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर चौकात गव्याचे दर्शन (video) | पुढारी

कोल्‍हापूर : विवेकानंद कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर चौकात गव्याचे दर्शन (video)

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर परिसरातून गवा माघारी जाण्याचे नावच घेईना असे झालंय. आज (गुरुवार) पहाटे शहराच्या मध्यवस्तीत पुन्हा गवा घुसला. सुमारे पाच तास त्याचा शहरातील रस्त्यावर वावर होता.

रात्री दीड वाजता मुक्त सैनिक वसाहत, महाडिक माळ या परिसरात गवा दिसल्याची माहिती आली. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ताराबाई पार्कातील विवेकानंद महाविद्यालयासमोर गव्याचे दर्शन झाले. ही माहिती पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवली. यानंतर वनविभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या यंत्रणा रस्त्यावर आल्या. पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत ही सर्व यंत्रणा गव्याला परतवण्याचे प्रयत्न करत होती.

गवा विवेकानंद महाविद्यालयापासून जिल्हा परिषद समोर आला. येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने कनान नगरच्या दिशेने गेला. उमेदपुरी परिसरातून तो महावीर उद्यान, उद्योग भवन येथे आला. तिथून पुढे तो भालजी पेंढारकर कला अकादमी समोरून जयंती नाल्यावर आला. तेथून दसरा चौकात आला. पुढे तो सीपीआर चौकात आला. तिथून बुधवार पेठेच्या दिशेने काही अंतर गेला. पुन्हा माघारी फिरून सीपीआर चौकातुन तो सकाळी सहाच्या सुमारास गवा शहर वाहतूक पोलीस शाखे समोरील जयंती नाला परिसरातील शेतात शिरला.

पहा व्हिडिओ : कोल्हापूरच्या रस्त्यांवरून गव्याची भटकंती सुरूच

Back to top button