कोल्हापूर : अमल महाडिक यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता

अमल महाडिक
अमल महाडिक

विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासमवेत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावे त्यांच्या कुटुंबाकडे असलेली मालमत्ता 21 कोटींवर आहे.

महाडिक यांच्याकडे 1 लाख 64 हजार रुपये इतकी रोख रक्कम आहे. 6 लाख 37 हजारांच्या ठेवी तसेच 79 लाखांचे शेअर्स तसेच पोस्ट, एनएसएस आदी ठिकाणी 18 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.

महाडिक यांनी विविध कंपन्या, ट्रस्ट तसेच मित्र, कुटुंबे आदींना 8 कोटी 49 लाख इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाडिक यांच्याकडे 25 लाखांचे दागिने, एक चारचाकी आहे.

त्यांच्याकडे 6 कोटी 29 लाख रुपयांची शेतजमीन तर बिगरशेती असलेली सुमारे 1 कोटी 96 लाख रुपये किमतीची जागा आहे. महाडिक यांच्यावर 4 कोटी 93 लाख रुपयांचे कर्जही आहे. त्यांच्या नावावर कोणतेही गुन्हे नाहीत, तसेच त्यांना न्यायालयाने कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेली नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news