कोल्हापूर : अमल महाडिक यांना जनसुराज्यचा पाठिंबा | पुढारी

कोल्हापूर : अमल महाडिक यांना जनसुराज्यचा पाठिंबा

वारणानगर : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपबरोबर असल्याने कोल्हापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना जनसुराज्यने पाठिंबा देण्याचा निर्णय सोमवारी रात्री येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. डॉ. विनय कोरे यांनी मतदारांना कितीही अडचणी आल्या तरी पक्षाला कमीपणा येऊ देऊ नका, असे आवाहन केले. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

महाडिक म्हणाले, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांची मोठी ताकद व पाठबळ मिळाल्यामुळे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित आहे. यावेळी महाडिक यांनी उपस्थित प्रत्येक मतदारांशी चर्चा केली. बैठकीस जनसुराज्यचे नेते प्रा. जयंत पाटील, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, मलकापूरचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, पन्हाळ्याच्या सभापती वैशाली पाटील, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांच्यासह पन्हाळा हातकणंगले, शाहूवाडी तालुक्यांतील सभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचलं का?

Back to top button