कोल्हापूर : नूल येथे लांडग्याच्या हल्ल्यात ७ बकऱ्यांचा मृत्यू, २ जखमी

कोल्हापूर : नूल येथे लांडग्याच्या हल्ल्यात ७ बकऱ्यांचा मृत्यू, २ जखमी

Published on

नूल; पुढारी वृत्तसेवा : नूल ( ता. गडहिंग्लज) येथे लांडग्याने केलेल्या हल्ल्यात सात बकऱ्या जागीच ठार झाल्या तर दोन बकऱ्या जखमी झाल्या. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

येथील इंदिरादेवी जाधव ज्युनिअर कॉलेज जवळील थोरात यांच्या शेतात अजित मल्लाप्पा धनगर यांच्या मालकीची बकरी बसवण्यात आली होती. अचानक रात्रीच्या वेळी लांडग्याने बकऱ्यांवर हल्ला केला. यात एक ते तीन महिने वयोगटातील सात बकऱ्या ठार झाल्या. पशू वैद्यकीय अधिकारी समाधान चव्हाण यांनी ठार झालेल्या बकऱ्यांचे शवविच्छेदन करून जखमी बकऱ्यांवर उपचार केले. वनरक्षक रणजित पाटील, वनपाल पी. जी. वारंग यांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेमुळे धनगर यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

     हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news