Jotiba Chaitra Yatra 2023 : ४८ तास अखंड सेवा; रुग्णसेवा, अन्नसेवेने भाविक, समाधानी | पुढारी

Jotiba Chaitra Yatra 2023 : ४८ तास अखंड सेवा; रुग्णसेवा, अन्नसेवेने भाविक, समाधानी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक डोंगराची वाट चालत होते. कोल्हापुरात आलेल्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, यासाठी हजारो हात मागील ४८ तास अविरत राबत आहेत. सेवाभावी संस्थांची अन्नछत्रे, देवस्थानच्या मोफत बस सेवेपासून महापालिका अग्निशमन पथकाचे पथक दिवस-रात्र सेवेत आहेत. जेवण, नाष्टा, पाणी, औषधे यांचा पुरवठा भाविकांना सेवाभावी वृत्तीने सुरू आहे.(Jotiba Chaitra Yatra 2023)

Jotiba Chaitra Yatra 2023 : अन्नछत्रामध्ये ३ लाखांवर भाविक

सहजसेवा ट्रस्टच्या वतीने २ एप्रिलपासून अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. गायमुख येथून पायी जाणाऱ्या तसेच बाहेरगावाहून आलेल्या २ लाखांवर भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. हे अन्नछत्र दिवस-रात्र सुरू असल्याचे अन्नछत्रप्रमुख सन्मती मिरजे प्रमोद पाटील यांनी सांगितले. शिवाजी चौक तरुण मंडळाच्या पंचगंगा नदी येथील अन्नछत्रामध्येही ६० हजार भाविकांनी प्रसाद घेतला. तसेच आर. के. मेहता ट्रस्टच्या अन्नछत्राकडेही हा ओघ कायम आहे.

एक हजार रुग्णांवर उपचार

आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी तीन वैद्यकीय पथके तीन शिफ्टमध्ये २४ तास कार्यरत होते. १६ वैद्यकीय अधिकारी, २१ आरोग्य अधिकारी यांच्यासह एकूण २२३ आरोग्य कर्मचारी नियुक्त होते. जोतिबा डोंगरासह केखले, बोरपाडळे, भुये, वडणगे या ४ प्राथमिक आरोग्य केंद्रां मध्ये २४ तास सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली होती. ३ एप्रिल ते ५ एप्रिल कालावधीत वैद्यकीय पथकामध्ये बाह्यरुग्ण ९६६ व अंतररुग्ण ५ असे अशा एकूण ९७१ रुग्णावर औषधे उपचार करण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button