Donald Trump Hush Money Case : अभिनेत्रीला पैसे देणे भोवले; जाणून घ्या कुठं गंडलं ट्रम्प तात्यांचं गणित… | पुढारी

Donald Trump Hush Money Case : अभिनेत्रीला पैसे देणे भोवले; जाणून घ्या कुठं गंडलं ट्रम्प तात्यांचं गणित...

मॅनहॅटन (अमेरिका); पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगारी प्रकरणांमुळे अटक करण्यात आली आहे. प्रौढ चित्रपट अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सचे वक्तव्य मीडियात आल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय पडझडीला सुरुवात झाली. २०२४ मध्ये त्यांचा पक्ष विजयी होऊन पुन्हा सत्तेत येईल, असे ट्रम्प यांना वाटत होते, परंतु आता ट्रम्प यांचे स्वप्न केवळ स्वप्नचं राहिलं असे दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत प्रौढ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींना पैसे देणे हा गुन्हा मानला जात नाही, मग डॅनियलला पैसे देताना ट्रम्प यांनी काय चूक केली की त्यांना अटक करण्यात आली. (Donald Trump Hush Money Case)

एक चूक लपविण्यासाठी खोटे बोलत स्वत:च अडकले ट्रम्प तात्या (Donald Trump Hush Money Case)

२०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी स्टॉर्मी डेनियलला ट्रम्प यांच्या सोबतच्या संबंधांवर तोंड बंद ठेवण्यासाठी १.२२ लाख डॉलर्स देण्यात आले होते. याचा खुलासा स्वत: अभिनेत्री स्टॉर्मी डेनियलने केला होता. विशेष म्हणजे, तिला पैसे दिल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, परंतु अभिनेत्रीला दिलेल्या रकमेचा हिशोब व्यावसायिक जमा खात्याच्या ऑडिटमध्ये नोंद करण्यात आला आणि येथेच डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला. एक खोटे लपवण्यासाठी ट्रम्प दुसरे खोटे बोलले आणि त्याच खोट्याच्या दलदलीत अडकत राहिले. ट्रम्प यांनी प्रथम कायदेशीर शुल्क सांगून व्यवसाय रेकॉर्डमध्ये खोटे बोलले, जी गुन्हेगारी बाब आहे. अमेरिकेच्या राज्यानुसार, या प्रकारालाही फसवणुकीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

३४ वेळा ट्रम्प यांनी खोटे बोलण्याचा केला पराक्रम

मॅनहॅटनच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नीने असे विधान केले की, एका गुन्ह्याला खोटे ठरवण्यासाठी फसवणूक करण्याच्या उद्देशाने व्यवसायिक रेकॉर्डमध्ये खोटी माहिती देणे हा यूएस राज्य कायद्यानुसार गुन्हा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गुन्हा लपवण्यासाठी एकापाठोपाठ एक असे ३४ वेळा खोटे बोललण्यात आले आणि हे एखाद्या गंभीर गुन्ह्यासारखे आहे. मात्र, या आरोपांवर स्पष्टीकरण देताना ट्रम्प यांनी स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे.


अधिक वाचा :

Back to top button