कोल्हापूर: महिला सन्मान योजना, एसटी महामंडळाला ५५ लाखांचे उत्पन्न | पुढारी

कोल्हापूर: महिला सन्मान योजना, एसटी महामंडळाला ५५ लाखांचे उत्पन्न

राशिवडे : प्रवीण ढोणे : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी जाहीर केलेल्या महिला सन्मान योजनेला महिला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज अखेर सुमारे २ लाख ८७ हजार ६२२ महिलांनी प्रवास केला. त्यामुळे जिल्ह्यातील बारा एसटी आगारांना सुमारे ५४ लाख ७१ हजार ७६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये इचलकरंजी आगार पहिल्या नंबरवर तर गगनबावडा आगार शेवटच्या क्रमाकांवर आहे.

एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास ३० प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. यामध्ये या नव्या योजनेची भर पडली आहे.

जिल्ह्यातील १२ एसटी आगारांच्या उत्पन्नामध्ये भर पडली आहे. योजना सुरु झाल्यापासुन आजअखेर झालेला महिला प्रवाशांची आकडेवारी व आगारनिहाय उत्पादन पुढीलप्रमाणे

आगार प्रवासी संख्या व कंसात उत्पन्न असे –

कोल्हापूर – २९,६९० (८,५७,४०७), संभाजीनगर – २९,९५४ (६,४२,०९९), इचलकरंजी – ४१,८७४ (७,२६,७८६), गडहिंग्लज – ३७,१२७ (५,३८,८१३), गारगोटी – २७,८८५ (५,७०,१५५), मलकापूर – १४,६२२ (२,९३,६९५), चंदगड – १३,४४७ (३,०४,६८८), कुरूंदवाड – २४,९७२ (३,३६,५३१), कागल – ३१,३२१ (५,१३,४०६), राधानगरी – १६,३९५ (३,१७,०३०), गगनबावडा – ४,१७७ (१,११,३३५), आजरा – १६,१५८ (२,५९,८१७). एकूण प्रवासी – २,८७,६२२ व उत्पन्न – ५४,७१,७६२.

हेही वाचा  

Back to top button