फेसबुक सहा तास बंद पडलं पण मार्क झुकेरबर्गचं एवढ्या हजार कोटींचं नुकसान झालयं | पुढारी

फेसबुक सहा तास बंद पडलं पण मार्क झुकेरबर्गचं एवढ्या हजार कोटींचं नुकसान झालयं

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमवारी रात्री अचानक साडे नऊच्या दरम्यान फेसबुक, व्हॉटस् अॅप, इंन्स्टाग्राम बंद पडलं होतं. तब्बल सात तास हे तिनही अॅप बंद पडले होते. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना त्रासाला सामोर जावं लागले. अनेक नेटकऱ्यांनी याची खिल्ली उडवली. ट्विटरवर याच्या मीम्स बनवल्या. पण याचा परिणाम फेसबुकच्या शेअरवर आणि मार्क झुकेरबर्गच्या कमाईवर झालायं.

फेसबुक, व्हॉटस् अॅप, आणि इंन्स्टाग्राम या तीनही प्लॅटफॉर्म कंपनीच्या डोमेन नेम सिस्टममध्ये आलेल्या त्रुटीमुळे बिघाड झाला होता. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म डाऊन झाले होते. सहा तासानंतर पुन्हा तीनही प्लॅटफॉर्म सुरळीत झाले.

फेसबुकचं किती झालं नुकसान?

फेसबुक डाऊन झाल्याच्या कारणामुळे कंपनीचे शेअर ४.९ टक्क्यांनी ढासळलेत. नोव्हेंबर २०२० नंतर एका दिवसात शेअर मध्ये सगळ्यात मोठी घसरण झाली. फेसबुकला या कारमामुळे कमाईतही नूकसान झालयं. डिजिटल अॅड मॅनेजमेंट फर्म इंडेक्स नूसार, डाऊनमुळे फेसबुकला प्रत्येक तासाला ४.६ कोटींच नूकसान झालं. हे नूकसान फक्त जाहीरातीमुळे झालं आहे. वेगवेगळ्या तज्ञांच मत आहे की, फेसबुकला प्रत्येक तासाला ७ कोटींच नूकसान झालं आहे.

याचा परिणाम फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांच्यावर पडला आहे. झुकेरबर्गची मालमत्ता सुमारे ५२ हजार कोटींनी कमी झाली आहे. संपत्तीतील या नुकसानीमुळे झुकेरबर्ग ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहेत.

फेसबुक डाऊन झाल्याचा फायदा ट्विटर आणि टिकटॉक सारख्या दुसऱ्या कंपन्यांना झालायं. फेसबुक बंद होते त्या दरम्यान ट्विटर आणि टीकटॉक या अॅपवरती ट्राफिक जास्त प्रमाणात होते.

६ महिन्यांपूर्वी, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभर ४२ मिनिट डाऊन झाले होते. रात्री ११.०५ वाजता डाऊन झाले होते. आणि सुमारे ११.४७ पर्यंत पुन्हा सुरळीत झाले होते.

यावर फेसबुक काय म्हटल?

यावर फेसबुकने एक ब्लॉग पोस्ट केला आहे. त्याक अस म्हटलयं की, एका फॉल्टी कॉन्फिग्रेशन चेंजमुळे ही समस्या आली आहे. हा कोणताही सायबर अटॅक किंवा हॅकींगचे फ्रकरण नाही. अस फेसबुकने म्हटल आहे.

ज्यावेळी पेसबुक डाऊन होते तेव्हा कंपनीचे प्रवक्ता एंडी स्टोन यांनी ट्विटरवर सांगितले की, लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लोकांना आमच्या अॅप्स आणि उत्पादनांमध्ये सुरु करण्यास समस्या येत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत. अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली होती.

हेही वाचलत का?

Back to top button