उर्वशी रौतेला ऋषभ पंतला म्हणाली हॅपी बर्थडे; झाली प्रचंड ट्रोल | पुढारी

उर्वशी रौतेला ऋषभ पंतला म्हणाली हॅपी बर्थडे; झाली प्रचंड ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीने २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि कर्णधार ऋषभ पंतला बर्थडे गिफ्ट दिले. दरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील पंतला बर्थडे विश करायला गेली. मात्र नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलाला चांगलेच ट्रोल केले. काही नेटकऱ्यांनी तर आता काही करुन नकोस बाई असे म्हणत तिच्यासमोर हात जोडले.

दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतचा वाढदिवस एकदम खास केला. दिल्लीने चेन्नईचा ३ विकेट्सने पराभव करुन गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दरम्यान, सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि वॉट्स अॅप बंद पडल्याने अनेक चाहत्यांनी ट्विटरवरुन दिल्लीला विजयाच्या आणि पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अनेक चाहत्यांप्रमाणे अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील ऋषभ पंतला ट्विटवरवरुन शुभेच्छा देण्यास गेली. मात्र नेटकऱ्यांनी तिला असे काही ट्रोल केले की, तिच्या शुभेच्छांची नाही तर ट्रोलिंगचीच चर्चा खूप झाली.

उर्वशी रौतेला पंतला त्रास देऊ नकोस

एका नेटकऱ्याने उर्वशी रौतेलाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना ‘आता ऋषभ पंतला त्रास देऊ नका, वर्ल्डकप नंतर तुम्ही त्याला मॅसेज पाठवा.’ अशी विनंती केली.

दुसऱ्या नेटकऱ्याने तर उर्वशी रौतेलाला दिदी म्हणत ‘कृपा करुन हे सगळं वर्ल्डकप नंतर करा.’ अशी विनवणी केली. तर एका नेटकऱ्याने तर ‘आमच्या मुलाचे लक्ष विचलीत करू नका’ असे सांगितले.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या सलग दुसऱ्या हंगामात क्वलिफायरमध्ये प्रवेश मिळवला आहे. २०२० च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये सध्या तीन संघ क्वालिफायरमध्ये दाखल झाले आहेत. त्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा समावेश आहे.

हेही वाचले का? 

Back to top button