कोल्हापूर : ऐनापूर ग्रामपंचायतीकडून माहेरचा आहेर, मुलीला लग्नात कन्यादान साडी भेट | पुढारी

कोल्हापूर : ऐनापूर ग्रामपंचायतीकडून माहेरचा आहेर, मुलीला लग्नात कन्यादान साडी भेट

ऐनापूर ( जि. कोल्हापूर) : नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या ऐनापूर ग्रामपंचायतीने माहेरचा आहेर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींना लग्नामध्ये कन्यादान साडी भेट दिली जाणार आहे. ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. प्रभारी सरपंच ईश्वर देसाई हे अध्यक्षस्थानी होते. ऐनापूर गावात यापूर्वीही विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. आठवडी बाजार, गुटखा बंदी, दारुबंदी, डिजिटल दिवाबत्ती सेवा, विधवा प्रथाबंदी, विधवा महिलांना एक दिवसाचा सरपंच, उपसरपंच पदाचा मान देणे यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे.

दरम्यान, गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत मुलीच्या लग्नात ग्रामपंचायतीतर्फे माहेरचा आहेर देण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. १ जानेवारीपासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आहे. मुलींना लग्नात कन्यादान साडी दिली जाणार आहे. यासह विविध विकासकामांवर चर्चा झाली.

ग्रामपंचायत सदस्या समिना मकानदार, सविता चौगुले, प्राचना देसाई, लहू दड्डीकर, राजू कुराडे, मनोहर देसाई, सदाशिव पाटील, सदाशिव देसाई, विलास देसाई, बाबुराव कागवाडे, अशोक शिंदे, संजय होडगे, शिवाजी देसाई, ग्रामसेविका सोनाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब देसाई यांनी आभार मानले.

Back to top button