१९ हजार कोटींचे हेरॉईन जप्‍त, अफगाणिस्‍तानहून तस्‍करी | पुढारी

१९ हजार कोटींचे हेरॉईन जप्‍त, अफगाणिस्‍तानहून तस्‍करी

अहमदाबाद; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्‍ये मुंद्रा बंदरातून सुमारे १९ हजार कोटींचे हेरॉईन जप्‍त करण्‍यात आले आहे. १९ हजार कोटींचे हेरॉईन जप्‍त दोन कंटेनरमधून अफगाणिस्‍तानमधून इराणमार्गे भारतात आल्‍याची प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट होत आहे. या प्रकरणी अफगाणिस्‍तानमधील नागरिकासह दाेघांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.  ही कारवाई महसूल गुप्‍तचर संचालनालयाने ( डीआरआय ) केली.

या कारवाईसंदर्भात ‘डीआरआय’ आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, अंमली पदार्थ तस्‍करीप्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद, दिल्‍ली, चेन्‍नई आणि मांडवी येथे शोधमोहिम राबविण्‍यात आली होती. दरम्‍यान, मुंद्रा बंदरात आलेल्‍या एका कंटेनरमध्‍ये सुमारे २ हजार किलो तर दुसर्‍या कंटेनरमध्‍ये १ हजार किलो हेरॉईन आले होते. हे कंटेनर इराणमधील एका बंदरातून गुजरातमधील बंदरात पाठविण्‍यात आले हाेते.

आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे १९ हजार कोटी इतकी आहे.

या कारवाईमध्‍ये अफगाणिस्‍तानमधील नागरिकासह दाेघांना  ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. मात्र अद्‍याप कोणालाही अटक करण्‍यात आलेली नाही.

हेरॉईन तस्‍करीतून तालिबान्‍यांना मदत

अफगाणिस्‍तान हा जगातील सर्वात मोठा हेरॉईनच्‍या उत्‍पादक देश आहे. जगातील ९० हेरॉईनचे उत्‍पादन याच देशातून होते. मागील काही वर्षांपासून अफगाणिस्‍तानमध्‍ये हेरॉईनच्‍या उत्‍पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या तस्‍करीतून आलेल्‍या पैशातून तालिबान्‍यांना आर्थिक रसद पुरवली गेली, असेही म्‍हटले जाते.

हेही वाचलं का?

 

Back to top button