विशाळगडावर भाविक, पर्यटकांसाठी प्रवेश बंद | पुढारी

विशाळगडावर भाविक, पर्यटकांसाठी प्रवेश बंद

विशाळगड :  कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळे, मंदिरे बंदअसल्याने किल्‍लेविशाळगडयेथील मलिक रेहान दर्गा दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला असून विशाळगडावर पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. भाविक व पर्यटकांनी दर्शनासाठी गडावर येऊ नये, असे आवाहन हजरतपीर मलिक रेहान मिरासाहेब दर्गा ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतीक असलेला किल्‍ले विशाळगडधार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील मलिक रेहान दर्गा व गड पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्रगेल्या दीड वर्षांपासूनकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  महाराष्ट्रातीलसर्वच धार्मिक स्थळे, मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. याचा फटका येथील पर्यटनालाही बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तिसर्‍यालाटेच्या शक्यतेने विशाळगडावर पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. भाविक व पर्यटकांसाठी गड बंद ठेवण्याचा निर्णयप्रशासनाने घेतल्याने गेली 25 दिवस पोलिसांचा बंदोबस्त गडाच्या पायथ्याशी आहे.

गडावरभाविकांना प्रवेश दिलाजात नसल्यानेयेणार्‍या पर्यटकांची मोठी कुचंबना व गैरसोय होतहोती. परिणामी भाविक व पर्यटकाना मनस्तापसहन करावा लागत होता. यामुळे हजरत पीर मलिक रेहान मिरासाहेबदर्गा ट्रस्टच्यावतीने कोरोना पार्श्‍वभूमीवर गडव दर्गा दर्शनासाठीपूर्णतः बंद करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दर्ग्याचादरवाजा बंद करण्यात आला असूनप्रवेशद्वारावर बॅरेकेट्स लावून बंदी घालण्यातआली आहे. तरी भाविक व पर्यटकांनी कोरोना काळात दर्शनासाठी गडावर येऊ नये, असेआवाहन दर्गा ट्रस्टी इम—ान मुजावर, नाजीम मुजावर, रज्जाक मुजावर, अबूबकर मुजावर यांनी केले आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

कोरोना पार्श्‍वभूमीवर गडावर जाण्यास बंदी आहे. तरीही काही पर्यटक येत असल्याने शाहूवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने गजापूर येथील नाक्यावर व केंबुर्णेवाडी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पर्यटकांना गडावर जाता येत नाही. परिणामी पर्यटक, भाविकांना 30 किलोमीटरचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पर्यटकांनी कोरोना काळात इकडे फिरकू नये.

Back to top button