कोल्हापूर : राधानगरीत जिवंत घोरपडीसह एकाला अटक

ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण
ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण
Published on
Updated on

राशिवडे : पुढारी वृत्तसेवा : राधानगरी येथील फराळे वन तपासणी नाक्याजवळ जिवंत घोरपड पकडून घरी नेताना रजेनाल हालेस डिसोजा (वय ४३, रा. काळम्मावाडी, बाचणी, ता. कागल) याला वनविभागाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फराळे गावाच्या हद्दीत अभयारण्य क्षेत्रातून रजेनाल डिसोजा पिशवीतून जिवंत घोरपड घेऊन जात होता. याची माहिती वनविभागाच्या पथकास मिळताच त्याची चौकशी करत जिवंत घोरपडीसह त्याला ताब्यात घेतले. घोरपड ही संरक्षित प्राणी असल्याने वनविभागाने गुन्हा नोंद करुन डिसोजास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

तर घोरपडीची वैद्यकीय तपासणी करुन तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. आरोपी डिसोजाकडे पासपोर्ट सापडला असून तो दुबईला जाऊन आल्याचे समजते. त्यामुळे त्याचा आणखी कोणी साथीदार आहे काय? त्याचे विदेशी तस्करी कनेक्शन आहे काय? याचा तपास सुरु आहे. ही कारवाई वन्यजीव वनपाल संजय कांबळे, तेजस्विनी पोवार, भैरवनाथ यादव यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल (वन्यजीव) अधिकारी एस. एस. पाटील आदी करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news