कराडात लोकवर्गणीतून उभारणार पहिली स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट : खासदार श्रीनिवास पाटील

स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट
स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा: आजच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगात युवा पिढीमध्ये चंगळवादी संस्कृती वाढत आहे. त्यामुळे कराडसह तालुक्यात एक चांगली युवा पिढी तयार व्हावी, यासाठी लोकवर्गणीतून पहिली स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट उभारण्याचा संकल्प खासदार श्रीनिवास पाटील यांनी जाहीर केला आहे.

मागील ३० वर्षापासून दुर्ग संवर्धनासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या कराडमधील प्रीतिसंगम सायकल ग्रुपचे संस्थापक दीपक बेलवलकर यांनी नुकतीच बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, पंच केदार, पंच बद्री, पंच प्रयाग यात्रा आपल्या दहा सहकार्‍यांसह पूर्ण केली आहे. या निमित्त दिपक बेलवलकर मित्र परिवाराकडून दिपक बेलवलकर यांना सहकुटूंब खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी अर्बंन कुटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह दिपक बेलवलकर यांच्याशी स्नेह असणारा विविध क्षेत्रातील मित्र परिवार उपस्थित होते.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी ट्रेकिंग, सायकलिंगमुळे आरोग्य उत्तम राहण्यास  मोठी मदत होते. युवा पिढीवर यामुळे चांगले संस्कार होतात. त्यासाठी युवा पिढीने अवघड मानल्या जाणार्‍या देवभूमी हिमालयाच्या पर्वत रांगा, उंच – उंच शिखिरे काबीज करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. त्यासाठी दिपक बेलवलकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकवर्गणीतून ट्रेकिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली जाणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देवभूमी हिमालयासह देश – विदेशातील ट्रेकिंग, सायकलिंग याला प्रोत्साहन, मार्गदर्शन यासह युवा पिढीला आवश्यक ती मदत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

सुभाषराव जोशी यांनी दिपक बेलवलकर यांच्या सहकार्‍यांचा आदर्श घेत युवा पिढीने सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिमालयाची पर्वत शिखरे प्रत्यक्ष जाऊन पाहिली पाहिजेत असे सांगितले. आनंदराव पाटील यांनी १९८५ साली केलेल्या राईडच्या आठवणींना उजाळा दिला. दिपक बेलवलकर यांचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी असून त्यापासून युवा पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दिपक बेलवलकर यांनी आपला अनुभव कथन केला.

यावेळी दीपक बेलवलकर यांचे सहकारी दत्तात्रय भस्मे, देवदत्त फलटणकर, रणजित शिंदे, वैभव गुरसाळे, अनिल वेर्णेकर, अशुतोष डुबल, डॉ. प्रथमेश चौगुले, गणेश लोहार, अवधूत जमाले आणि किशोर उडपी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

डॉ. कमलाकर गुरसाळे २००८ चित्रफित केलेल्या हिमालयातील ट्रेकिंगची चित्रफित सादर केली. तर तन्वी बेलवलकर हिने आपले वडील दिपक बेलवलकर यांच्या आजवरच्या प्रवासावरील चित्रफित सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य घाडगे यांनी केले. दिपक बेलवलकर यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन व उपस्थितांचे आभार सुनिल वाडकर यांनी मानले.

अवघ्या १० मिनिटात जमले १ लाख ८ हजार

खासदार श्रीनिवास पाटील यांनी ट्रेकिंग इन्स्टिट्यूटचा मनोदय व्यक्त करतानाच स्वतःचे ५० हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर माजी आमदार आनंदराव पाटील यांनी २५ हजार जाहीर केले. तर प्रीतिसंगम सायकल ग्रुपचे अनिल वेर्णेकर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील आणि प्रीतिसंगम हास्य क्लबचे अध्यक्ष डी. एस. पवार यांनी प्रत्येकी ११ हजार रूपये जाहीर झाले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news