कोरोनासंदर्भात ग्रामीण जनता बेफिकीर; मास्कवापराकडे दुर्लक्ष | पुढारी

कोरोनासंदर्भात ग्रामीण जनता बेफिकीर; मास्कवापराकडे दुर्लक्ष

राजेंद्र कवडे देशमुख

बावडा : सध्या सार्वजनिक ठिकाणी मास्कवापराबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जनतेने काटेकोरपणे काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असले, तरी अजून जनतेवर निर्बंध घातलेले नाहीत. नागरिकांचे दैनंदिन जनजीवन, बाजारपेठा पूर्ववत चालू आहेत.

मात्र, देश कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा मागमूसही ग्रामीण जनतेच्या चेहर्‍यावर दिसत नाही. फक्त सोशल मीडियावर तात्पुरती चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिक जणूकाही कोरोना हद्दपारच झाल्याच्या आविर्भावात सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. घराबाहेर सुशिक्षित नागरिक, शासकीय नोकरदारही कोरोनाचे नियम पाळत नाहीत.

पुणे : जिल्ह्यात 123 पाण्याचे स्रोत दूषित

कोरोनाच्या विशेषत: दुसर्‍या लाटेत गावोगावी अनेक कुटुंबांतील कर्त्या माणसांचे मृत्यू झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागल्याने अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. ही परिस्थिती सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. मात्र, तरीही नागरिक चौथ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर नियमांकडे काणाडोळा करीत आहेत. सध्या पुन्हा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याने कोरोना नियमांच्या पालनाबाबतचे दुर्लक्ष चिंताजनक आहे.

नागरिकांनी घराबाहेर मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. लसीकरण व बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे यांनी केले आहे. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच 60 वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस चालू आहे. नागरिकांनी डोस घेऊन सहकार्य करावे. कोरोनाची शंका असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामीण भाग 100 टक्के मास्कमुक्त!

शहरांमध्ये रुग्ण दररोज वाढत असताना ग्रामीण भाग अद्यापही चौथ्या लाटेपासून दूरच आहे. तिसर्‍या लाटेतही ग्रामीण भागात कमी रुग्ण आढळले. त्यामुळे कोणीच मास्क वापरत नसून ग्रामीण भाग 100 टक्के मास्कमुक्त दिसत आहे. कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही.

हेही वाचा

एकही शिवसैनिक गद्दार नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चिंता नाही : उद्धव ठाकरे

झोळ पडलेल्या तारांमध्ये टाकले विद्युत खांब

अंथुर्णे येथे पालखी मुक्कामाची तयारी सुरू

 

Back to top button