कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गगनबावडा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री सतेज पाटील यांनी भुईबावडा घाटाची पाहणी केली. गगनबावडा दौऱ्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे घाटातील दरड कोसळण्याची घटना घडत आहे. तर येथील रस्ता देखील खचले आहे. यामुळे भुईबावडा घाटातून तळ कोकणाकडे जाणारी हतूक बंद आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे काँक्रेटिकरण करण्याबरोबर या ठिकाणचे रस्ते देखील काँक्रेटिकरण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अतिवृष्टीने रस्ते खचत असल्याने पुन्हा अशा घटना घडु नये यासाठी त्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहासिलदार रामदास झलके, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील हे उपस्थित होते.
याच्यासोबत डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, गगनबावडा सभापती संगीता पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे, सरपंच दगडू भोसले, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सारिका कुलकर्णी जाधव, विभागीय वन अधिकारी सुधीर सोनवणे, विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पी. डी. जाधव, बंडाआप्पा पडवळ, दादू पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?