फुलांच्या माळांची विक्री ते आमदार…रमेश लटके यांचा थक्‍क करणारा राजकीय प्रवास

फुलांच्या माळांची विक्री ते आमदार…रमेश लटके यांचा थक्‍क करणारा राजकीय प्रवास
Published on
Updated on

सरुड : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( ramesh latke ) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्याने दुबई येथे निधन झाले. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्‍यांच्‍या आकस्‍मिक निधनाने शिवसेनेच्‍या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील नागरिकांना धक्‍का बसला आहे.

लोकसंपर्काच्या जोरावर शिवसेना शाखा प्रमुख

आमदार रमेश लटके हे शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाईजवळच्या शेम्बवणे पैकी धुमाकवाडी या छोट्या गावातील मूळ रहिवासी होते. मुंबईचे चाकरमानी असणारे वडिलांसोबत त्यांनी मुंबईत दुधाचा व्यवसाय, फुलांच्या माळा (हार) विकण्याचा व्यवसायाने आपली कारर्कीद सुरु केली. यातून त्यांनी लोकसंपर्काच्या जोरावर शिवसेना शाखा प्रमुख, मुंबई महानगरपालिकेचे सलग तीनदा नगरसेवक,  स्थायी समिती सभापती, बेस्ट अध्यक्ष आणि पुढे सलग दोनवेळा आमदार असा सर्वसामान्‍यांना थक्‍क करणारा राजकीय प्रवास केला. बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात त्यांनी आपला जम बसविला होता.

रमेश लटके यांनी लढवली होती शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा पोटनिवडणूक

शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' चिन्हावर रमेश लटके यांनी शाहूवाडी-पन्हाळा विद्यानसभा (सन २०००) पोटनिवडणूक लढवली होती. शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात शिवसेना संघटना बांधणीत त्यांनी महत्त्‍वाचे योगदान दिले होते.

सलग  दाेनवेळा झाले आमदार

काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांना हरवून २०१४ मध्ये रमेश लटके हे  पहिल्यांदा आमदार झाले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांना पराभूत केले होते. हाडाचा शिवसैनिक म्हणून 'मातोश्री'वर त्‍यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याकडून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news