Honey Trap : ‘हनी ट्रॅप’मध्‍ये अडकलेल्‍या जवानाने पाकिस्‍तानला दिली गाेपनीय माहिती! | पुढारी

Honey Trap : 'हनी ट्रॅप'मध्‍ये अडकलेल्‍या जवानाने पाकिस्‍तानला दिली गाेपनीय माहिती!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

हनी ट्रॅपमध्‍ये ( Honey Trap ) अडकलेल्‍या हवाई दलाच्‍या जवानाला दिल्‍ली पोलिसांच्‍या गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने अटक केली आहे. देवेंद्र शर्मा असे त्‍याचे नाव असून, हवाई दलाची गौपनीय माहिती त्‍याने पाकिस्‍तानची गुप्‍तहेर संघटना ‘आयएसआय’ला दिल्‍याच्‍या संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

‘एएनआय’ वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, हवाई दलाचा जवान देवेंद्र शर्मा हा ‘हनी ट्रॅप’मध्‍ये ( आकर्षक व्‍यक्‍तीचा वापर करुन एखाद्‍याला जाळ्यात अडकवणे व त्‍यानंतर विविध कारणांसाठी त्‍याचा वापर करणे ) मध्‍ये सापडला होता. शर्मा याच्‍याकडून हवाई दलातील गोपनीय माहिती मिळवण्‍यचा प्रयत्‍न झाला आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे, त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बँक खात्‍यातून काही संशयित आर्थिक व्‍यवहार झाल्‍याची माहिती प्राथमिक चाैकशीत समाेर आली आहे.

हवाई दलाची गौपनीय माहिती पुरविल्‍याच्‍या संशयावरुन दिल्‍ली पोलिसांनी देवेंद्र शर्मा याला अटक केली आहे. त्‍याची चौकशी सुरु असल्‍याचे दिल्‍ली पोलिसांनी सूत्रांनी म्‍हटलं आहे.

Honey Trap : सोशल मीडियावरुन हनी ट्रॅप

देवेंद्र शर्मा याची सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एका महिलेची ओळख झाली. यातूनच पुढे तो तिच्‍या जाळ्यात ओढला गेला. त्‍याने भारतीय हवाई दलातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांच्‍या पोस्‍टिंग व अन्‍य गाैपनीय माहिती संबंधित महिलेला दिली असल्‍याचा संशय आहे. शर्मा हा मुळचा उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील आहे. त्‍याचे सिम कार्ड पोलिसांनी जप्‍त केले आहे. दिल्‍ली पोलिसांनी त्‍याला ६ मे रोजी अटक केली आहे. याची माहिती लष्‍कराच्‍या गुप्‍तचर विभागाला देण्‍यात आली आहे. शर्मा याच्‍यावरील आरोप सिद्‍ध झाल्‍यास त्‍याला तीन वर्षांपासून जन्‍मठेपपर्यंतची शिक्षा होवू शकते.

 

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

 

Back to top button