पुणे : किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल हॉस्पिटलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल हॉस्पिटलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ज्या महिलेने पैशासाठी किडनी विकली त्या महिलेलादेखील आरोपी करण्यात आले आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे.

डॉ. परवेज ग्रेट मॅनेजींग ट्रस्टी, रेबेका जॉन (डेप्युटी डायरेक्टर मेडीकल सर्विसेस), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे (कन्सलटंट नॅफ्रोलॉजिस्ट), डॉ. मुफ्त भाटी (युरोलॉजिस्ट), डॉ. हिमेश गांधी (युरोलॉजिस्ट), सुरेखा जोशी (ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर) यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

१५ लाखांच्या आमिषाने एका महिलेची किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. याप्रकरणात राज्य आरोग्य विभागाने यापूर्वी रुबी हॉल रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. त्यांनतर 'रुबी हॉल क्लिनिक'मध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. सुतार या महिलेला १५ लाख रुपये देण्याचे आमिष साळुंखे यांनी दाखविले. मात्र, ते न मिळाल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला होता.

याप्रकरणात आता रुबी हॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कायदेशीर सल्लागार यांच्यावर फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. किडनी प्रत्यारोपनाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे मॅनेजिंग ट्रस्टी हे तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोरेगांव पार्क पोलिस करत आहेत.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news