अंगारकी संकष्‍टी : गणेश भक्‍तांची मंदिरात गर्दी; मंदिरांची आकर्षक सजावट | पुढारी

अंगारकी संकष्‍टी : गणेश भक्‍तांची मंदिरात गर्दी; मंदिरांची आकर्षक सजावट

कोल्‍हापूर ; पुढारी ऑनलाईन गणपती बाप्पांच्या पूजनाने शुभ कार्याची सुरुवात केली जाते. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते. मात्र मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्‍हणतात. आज (दि. १९) रोजी अंगारकी संकष्‍टी असून, चंद्रोदय ९. ३५ मिनिटांनी आहे.

आजच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. गणपतीला मोदक प्रिय असल्याने गणेशभक्‍त मोदकांचा नैवेद्यात आवर्जून समावेश करतात.

संकष्टी  निमित्त  भाविक दिवसभर उपवास करतात. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्‍यानंतर उपवास सोडला जातो. आज रात्री ९.३५ मिनिटांनी चंद्रोदय आहे.

कोरोनाचे निर्बंध हटवल्‍यानंतर आज अंगारकी संकष्टी निमित्त गणेशभक्‍तांनी शहरातील गणेश मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराबाहेर गणपतीसाठी दुर्वा, फुले, नारळ, पेढे या पूजा साहित्‍यांची दुकाने थाटन्यात आली आहेत. अंगारकी संकष्‍टीला महत्‍व असल्‍याने शहरातील मंदिरांनी गणेशभक्‍तांची होणारी गर्दी लक्षात घेउन जय्यात तयारी केली आहे. गणेश मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button