सोलापूर : तडीपार आरोपी, नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला | पुढारी

सोलापूर : तडीपार आरोपी, नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  तडीपार गुंड सचिन ऊर्फ बॉबी शिंदे याच्‍यासह त्‍याच्‍या नातेवाईकांनी रविवारी (दि. १७) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ला करून जखमी केले हाेते. या हल्ल्यात पोलीस नाईक रविराज काळे जखमी झाले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी तडीपार गुंड सचिन उर्फ बॉबी शिंदे हा विनापरवानगी सोलापुरामध्ये येऊन रात्री साडेनऊच्या सुमारास फिरताना दिसून आला. त्याला पोलीस नाईक काळे आणि पोलीस शिपाई पाटील या दोघांनी ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे नेले. याचदरम्यान सचिन शिंदे, त्याची पत्नी किर्ती शिंदे, सुलोचना दत्तात्रय शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे यांच्यासह इतर दोन अनोळखी पुरुषांनी पोलिसांना विरोध करीत त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. या सर्वांनी पोलीस कर्मचार्‍यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करीत त्यांच्याशी झटापट केली. यावेळी नातेवाईकांनी काळे यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर चावा घेऊन त्यांना जखमी केले.

नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी उद्या अखेरची संधी

पोलिसांनी शिंदे याला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव आला होता. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात काळे यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून झालेले चित्रीकरण पाहून संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button