कोल्हापूर : शियेतील देव मामाच्या मृत्यूच्या चौकशी करण्याची मागणी | पुढारी

कोल्हापूर : शियेतील देव मामाच्या मृत्यूच्या चौकशी करण्याची मागणी

शिये (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा: शिये (ता. करवीर) येथे २१ जुलै रोजी तृतीयपंथीचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून तो दागिने चोरी करताना प्रतिकार करताना केलेला खून असल्याचा संशय आहे. या खुनाचा योग्य पध्दतीने तपास करुन खुनाचा शोध लावावा यासाठी शिरोली पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथींनी जोरदार निदर्शने केली.

याशिवाय महाकाली तृतीयपंथी देवदासी संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
मृत्यू झालेल्या देवमामाच्या घरातील सोन्याचे सुमारे ३५ ते ४० तोळे सोन्याचे दागिने गायब झाला होते. यावेळी घराच्या दाराला बाहेरून कडी होती. त्यामुळे खुन झालेचा संशय बळावला असून शिरोली एमआयडीसी पोलिसांनी योग्य तपास केलेला नाही. असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यानी केला आहे.

अधिक वाचा 

सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा (वय ४२, सध्या रा. रामनगर, शिये, मूळगाव हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

तीन वर्षीपुर्वी घरातून सोन्या- चांदीच्या दागिन्याची चोरी झाली होती

शिये येथील रामनगरमध्ये सतीश पवार हा तृतीयपंथीय गेली दहा वर्षे रहात होता. तृतीयपंथी असल्याने त्यांनी आपले आयुष्य देवीचा जोगता म्हणून जगत होता. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने होते. त्यामुळे तीन वर्षीपुर्वी त्याच्या घरातून सोन्या- चांदीच्या दागिन्याची चोरी झाली होती. पण देवाच्या दागिने चोरल्याने देवाचा कोप होईल या भितीने चोरट्याने दागिने आणून परत दारात टाकले होते.

अधिक वाचा 

सध्या मात्र, दागिने चोरीसाठी आलेल्या चोरट्यास प्रतिकार करताना त्यांचा खून झाला असावा अशा संशय आला आहे. कारण सतीश पवार यांच्या घरात झटापट झालेल्या खुणा सापडल्या आहेत. असे त्याच्या नातेवाईकांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आहे.

सतीश पवार याला न्याय मिळालाच पाहिजे, या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. खूनाचा शोध लवकरात- लवकर लावून आरोपींना पकडले पाहिजे. अशा घोषणा देत तृतीयपंथीयांनी शिरोली पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. यामुळे या परिसरात खळबळ माजली. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अधिक वाचा 

या आंदोलनाचे नेतृत्व गीता मिरासाहेब मोमीन (अध्यक्ष), मनिषा पुणेकर, संतोष जाधव, सपना मोरे, नेहा आत्तार, सुहास मोहीते यांनी केले. यावेळी शिवाजी आळवेकर, सुनिल पाटील, मयुरी आळवेकर, दत्ता मांगलेकर, शुभम कुंभार, पिराजी कांबळे आदीसह बहुसंख्य देवदास- देवदासी उपस्थित होते.

हा तृतीयपंथीचा मृत्यू नैसर्गिक, हदयविकार अन्य कारणाने झाला असेल तर घरातील सोन्या- चांदिचे दागिने गायब कसे?. तसेच घराला बाहेरून कडी असल्यामुळे नागरीकांत अजूनही संभ्रम आहे. या घटनेची शियेसह परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button