वारणा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्षपदी विश्वेश कोरे यांची निवड | पुढारी

वारणा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्षपदी विश्वेश कोरे यांची निवड

वारणानगर ः पुढारी वृत्तसेवा

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरी सहकारी बँकांना व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करून कामकाज करणे बंधनकारक आहे. त्यास अनुसरून श्री वारणा सहकारी बँकेने व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करून त्यांची पहिली सभा शुक्रवारी झाली. या सभेमध्ये व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्षपदी विश्वेश निपुणराव कोरे यांची निवड करण्यात आली.

भविष्याचा वेध घेत येणार्‍या सर्व बदलांना सामोरे जात स्पर्धेला समर्थपणे तोंड देणारी अर्थप्रणाली विकसित करू व अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाची कास धरत प्रगतीची घोडदौड कायम ठेवू तसेच बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, असे मत विश्वेश कोरे यांनी या निवडीवेळी व्यक्त केले.

  • वारणा सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वेश कोरे यांचे नाव उत्तमराव पाटील यांनी सुचविले व त्यास अण्णासाहेब देसाई यांनी अनुमोदन दिले.यावेळी बँकेचे चेअरमन निपुणराव विलासराव कोरे, व्हा. चेअरमन उत्तमराव पाटील, संचालक अ‍ॅड. महादेव चावरे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सीए सुनील नागावकर, अण्णासाहेब देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ, जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड व डेप्युटी जनरल मॅनेजर पी. टी. पाटील उपस्थित होते.

Back to top button