American Airlines : हद्‍दच झाली…महिला प्रवाशाचा मास्‍क घालण्‍यास नकार, विमान निम्‍म्‍या वाटेतून माघारी परतले | पुढारी

American Airlines : हद्‍दच झाली...महिला प्रवाशाचा मास्‍क घालण्‍यास नकार, विमान निम्‍म्‍या वाटेतून माघारी परतले

वॉशिंग्‍टन : पुढारी ऑनलाईन
जगभरातील अनेक देशांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे सर्वत्रच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, यावर प्रशासनाचा भर आहे. मात्र अमेरिकेतही नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. अशातूनच एका विमान प्रवासावेळी मास्‍क घालणार नाही, हा एका महिला प्रवाशाचा हट्‍ट अन्‍य प्रवाशांना भलताच महागात पडला. अमेरिकन एअरलाइन्‍सने ( American Airlines )  विमान निम्‍म्‍या प्रवासातून माघारी घेतले. या गाेंधळात सुमारे अडीच तासांहून अधिक काळ अन्‍य प्रवासी भरडले गेले.

American Airlines : महिला प्रवाशाचा हट्‍ट, सर्वच प्रवाशांचा जीव टांगणीला

अमेरिकन एअरलाइन्‍सचे विमानाने लंडनसाठी उड्‍डाण घेतले. विमानात १२९ प्रवासी होते. प्रवासाला प्रारंभ झाला तेव्‍हा सर्व प्रवाशांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. यावेळी एका ४० वर्षीय महिलेने मास्‍क घालणार नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे एअरलाइन्‍नसने पुढील प्रवास करता येणार नाही, असा इशारा तिला दिला. तरीही ती आपल्‍या हट्‍टावर कायम राहिल. काही झाले तरी मास्‍क घालणार नाही, असे तिने स्‍पष्‍ट केले. तर पुढील प्रवास होणार नाही, असे एअरलाइन्‍सने सांतिले. केले. या गोंधळात विमान सुमारे अडीच तासांहून अधिक काळ हवेतच राहिले.

विमान पुढे जाणार नाही, स्‍पष्‍ट केल्‍याने सर्वच प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. अमेरिकन एअरलाइन्‍सने विमान पुन्‍हा मियामी आतंरराष्‍ट्रीय विमानतळावर पुन्‍हा जाण्‍याचा निर्णय घेतला. विमान धावपट्‍टीवर उतरले. कर्मचार्‍यांनी संबंधित महिलेला पोलिसाच्‍या हवाली केले. या संपूर्ण प्रकारावर अमेरिकन एअरलाइन्‍सने एक निवदेन प्रसिद्‍ध केले आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, कोरोना प्रतिबंधक नियमांच्‍या पालनासाठी आम्‍ही हा निर्णय घेतला. यामुळे अन्‍य प्रवाशांना झालेल्‍या त्रास बद्‍द आम्‍ही माफी मागत आहोत.

हेही वाचलं का? 

 

Back to top button