Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; आजचा युक्तीवाद संपला | पुढारी

Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; आजचा युक्तीवाद संपला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे (  Nitesh Rane ) यांच्या अटकपूर्व जामिनावर आज (दि. २९) सुनावणी झाली असून उद्या आदेश  येणार आहे.

एक वाजता सुनावणी सुरु झाली. यानंतर दुपारच्‍या ब्रेकनंतर सुमारे तीन तासांहून अधिक काळ सलग दोन्‍ही बाजूंनी युक्‍तीवाद झाला. यावेळी राणेंचे वकील आणि सरकारी वकिलांमध्‍ये जाेरदार खडाजंगीही झाली.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात येथील जिल्हा न्यायालयात सादर असलेल्या आमदार नितेश राणे (  Nitesh Rane ) यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी झाली होती. आ. नितेश राणे आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वकिलांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडल होतं. बुधवारी सकाळी पुन्‍हा सुनावणी झाली.

18 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर कणकवली येथे चाकूहल्ला झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी यापूर्वी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये यासाठी आमदार नितेश राणे तसेच गोट्या सावंत यांनी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

हेही वाचलं का? 

Back to top button