रत्नागिरी : जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी ५० लाखाचा निधी | पुढारी

रत्नागिरी : जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी ५० लाखाचा निधी

खेड शहर; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यात जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी राज्य सरकारकडून ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या चार दिवसांत गाळ काढण्याचे काम सुरू होणार असून ४ लाख घनमीटर गाळ काढला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.७) वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

खेड तालुक्यातील जगबुडी नदीला २००५ व २०२१ या वर्षी महापूर आला होता. तसेच दरवर्षी पुरामुळे खेड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना दरवर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. ही हानी पुन्हा होऊ नये याकरिता उपाययोजना म्हणून नदीतील गाळ काढण्याची मागणी केली जात होती. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला आमदार योगेश कदम, पालकमंत्री उदय सामंत, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, नाम फाऊंडेशनचे  मल्हार पाटेकर उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात भरणे बंधारा ते नारंगी नदी जगबुडी नदीला मिळते तिथेपर्यंत गाळ काढण्याचे ठरले. यासाठी ५० लाख रूपयांचा निधी सरकारकडून दिला जाणार आहे. या बैठकीला खेड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष  प्रमोद बुटाला, उपाध्यक्ष  विश्वास पाटणे, सचिन करावा, प्रसन्न पाटणे, ऋषी कानडे आदी उपस्थित होते. दरम्यान, खेडमध्ये नदीपात्राचा गाळ काढण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांत ३.५ कोटींची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button