जामखेड : मतदारसंघात 26 गावांत बसविणार नवीन रोहित्र : आ. राम शिंदे | पुढारी

जामखेड : मतदारसंघात 26 गावांत बसविणार नवीन रोहित्र : आ. राम शिंदे

जामखेड; पुढारी वृतसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील 26 गावांमधील सिंगलफेज आणि थ्री फेज रोहित्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे 2 कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे.
मतदारसंघात नवीन रोहित्र बसविण्याची मागणी शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती. त्याची तातडीने दखल घेत 26 गावांमध्ये नवीन रोहित्र बसविण्यासाठी 1 कोटी 80 लाख रूपये निधी मागणीचा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन अधिकार्‍यांकडे सादर केला आहे.

नव्या रोहित्रांमुळे शेतकर्‍यांना लाभ
रब्बी हंगामात शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीज मिळाली नाही. एकच सर्किट चालवावे लागल्याने रोहित्रावर ओव्हरलोड येत होता. शेतकर्‍यांची या त्रासातून सुटका होण्यासाठी अधिक रोहित्रांसाठी प्रस्ताव सादर केला असून, त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

Back to top button