रत्‍नागिरी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट | पुढारी

रत्‍नागिरी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट

रत्नागिरी ; पुढारी वृत्‍तसेवा : रत्‍नागिरी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट काढून पैशांची मागणी केल्‍याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन.पाटील यांच्या सरकारी अधिकृत Collectorate Ratnagiri या फेसबूक अकाउंटचे बनावट खाते तयार करून संबंधित व्यक्ती जनतेकडे पैशाची मागणी करत आहे. संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. दरम्‍यान रत्‍नागिरी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंटच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांचे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी फेसबुक अकाउंट काढण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे बनावट अकाउंट तयार करून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, आधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे. रुग्णालय असल्याने पैशाची आवश्यकता आहे. अशा आशयाचे मेसेज मेसेंजर द्वारे अज्ञात व्यक्ती पाठवत आहे.

तरी Collectorate Ratnagiri नावे बनावट असलेल्या अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, ज्यांना अशा अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट येथील त्यांनी नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी बी.एन.पाटील यांनी फेसबुक अकाउंट द्वारे केले आहे.

पहा व्हिडिओ : आठवणी कोल्हापूर गणेश उत्सवाच्या

Back to top button