

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाने जिल्ह्यात होणार्या मृत्यूची संख्या कमी होत आहे. शनिवारी जिल्ह्यातील 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 185 नव्या बाधितांची नोंद झाली. शहरामध्ये दिवसभरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर दोन आठवड्यांनंतर शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच कोरोनातून बरे झाल्याने शनिवारी 401 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात बाधितांच्या संख्येचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. ग्रामीण भागामध्ये मृत्यूची संख्या कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. शनिवारच्या आकडेवारीत अक्कलकोट 1, बार्शी 17, करमाळा 28, माढा 16, माळशिरस 36, मंगळवेढा 9, मोहोळ 10, उत्तर सोलापूर 1, पंढरपूर 57 आणि सांगोला तालुक्यात 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर दक्षिण सोलापूर तालुक्यात एकही कोरोनाबाधित आढळला नाही. ग्रामीण भागातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.