लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्‍यामुळेच आरोप : पूजा खेडकरांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद

अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय दिल्‍ली न्‍यायालयाने ठेवला राखून
Pooja Khedkar
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्‍यासाठी दाखल केलेल्‍या याचिकेवर आज (दि.३१) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्‍यासाठी दाखल केलेल्‍या याचिकेवर आज (दि.३१) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंदर कुमार जंगला यांच्‍यासमाेर दाेन्‍ही बाजूंनी जाेरदार युक्‍तीवाद केला. पूजा खेडकरांनी माध्‍यमांकडे स्‍वत:ची बाजूच मांडलेले नाही. कारण त्‍यांचा व्‍यवस्‍था आणि न्‍यायालयावर पूर्ण विश्‍वास आहे. लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळे त्‍यांच्‍याविरुद्ध आराेप केले जात अहेत, असा दावा यावेळी खेडकरांच्‍या वकिलांनी केला. तर कोणातरी फसवणूक केल्‍याशिवाय फसवणूक होऊ शकत नाही. या प्रकरणात 'यूपीएससी'ची फसवणूक झाली आहे, असे सरकारी वकिलांनी स्‍पष्‍ट केले. दाेन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर न्‍यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे. गुरुवार, १ ऑगस्‍ट राेजी दुपारी ४ वाजता निर्णय दिला जाईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

आठ डॉक्टरांच्‍या एम्सच्या बोर्डाने दिले दिव्‍यांग असल्‍याचे प्रमाणपत्र : खेडकर यांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद

खेडकर यांच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ॲड. माधवन यांनी सांगितले की, पूजा खेडकर एकापेक्षा अधिक प्रकारे दिव्‍यांग असलेली उमेदवार आहे. यासंदर्भात एका डॉक्‍टरचे नाही तर आठ डॉक्टरांच्‍या एम्सच्या बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र त्‍यांच्‍याकडे आहे. या प्रमाणपत्राची मूळ प्रत केंद्रीय लोकसेवा आयोगा(यूपीएससी) कडे आहे. यामध्‍ये फसवणूक कुठे आहे?, असा सवालही त्यां‍नी केला.

खेडकरांना 'युपीएससी'ने केवळ नोटीस बजावली आहे

पूजा खेडकर यांना दोषी ठरवता येत नाही कारण अद्याप त्‍यांनी कोणतीही चूकीची माहिती दिलेली नाही. त्‍यांना १८ जुलै रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगा(यूपीएससी)ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्‍यांना दोषी ठरवल्‍यानंतरच पुढील कार्यवाही होवू शकते. मात्र त्यासाठी एक प्रक्रिया आहे. 'युपीएससी'ने नोटीस बजावल्‍यानंतर दुसर्‍या दिवशी त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला. आता दिल्‍ली पोलीस म्‍हणू शकतात की, त्‍यांना कोठडीत चौकशी करायची आहे. फौजदारी खटला दाखल करण्यात प्राधिकरण इतकी घाई का आहे? आम्‍हाला बचाव करण्यासाठी मला पुरेशी संधी दिली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.

लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्‍यामुळेच आरोप

खेडकरांविरोधात गुन्‍हा दाखल होताच माध्‍यमांनी खेडकरांविरोधात चुकीची माहिती देण्‍यास सुरुवात केली आहे, असा आरोप करत त्‍यांनी माध्‍यमांकडे स्‍वत:ची बाजूच मांडलेले नाही. कारण त्‍यांचा व्‍यवस्‍था आणि न्‍यायालयावर पूर्ण विश्‍वास आहे. लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळे त्‍यांच्‍याविरुद्ध आराेप केले जात असल्‍याचा दावाही ॲड. माधवन यांनी केला.

हे प्रकरण उमेदवार दिव्‍यांग असल्‍याचा खोटा दावा करण्‍यासंदर्भातील : न्‍यायालय

उच्‍च न्‍यायालयाने तीन प्रयत्‍नांसाठी परवानगी दिल्‍याचे तुम्‍ही सांगता. तुम्‍हाला परवानगी कशी मिळाली न्‍यायालयास सविस्‍तर सांगा. हे प्रकरण उमेदवार दिव्‍यांग असल्‍याचा खोटा दावा करण्‍यासंदर्भातील आहे. युपीएससी परीक्षा संबंधित उमेदवाराने कितीवेळा दिली याबाबत नाही, असे पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंदर कुमार जंगला यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar | समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर

दिव्‍यांग आणि महिला असल्‍याने कारवाई केली का?

पूजा खेडकर या युपीएससीच्‍या एक लढवय्‍या उमेदवार आहेत. युपीएसीद्वारे प्रत्येक टप्प्यावर उमेदवारी वैध करण्यासाठी त्‍यांना संघर्ष करावा लागला. दिव्‍यांग व्यक्ती म्हणून कायदा आणि सुधारणा करूनही त्‍यांच्‍यासाठी जीवन सोपे नव्हते. यासाठी त्‍यांना मुंबईत प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर जावे लागले, असा युक्‍तीवाद ॲड. माधवन यांनी केला. पूजा खेडकर या घटस्फोटित पालकांची मुलगी आहे. शारीरिक अपंगत्वाला त्‍यांना तोंड द्यावे लागले आहे. आयोगाच्या आदेशानुसार खटला सुरू आहे. संबंधित उमेदवार दिव्‍यांग आहे आणि महिला आहे म्‍हणून केंद्रीय लोकसेवा आयोग तिच्‍याविरुद्ध युद्ध पुकारत आहे?, असा सवालही त्‍यांनी केला.

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेली कंपनी सील

यूपीएससीची फसवणूक झाली आहे : सरकारी वकील

यावेळी सरकारी वकिलांनी स्‍पष्‍ट केले की, कोणातरी फसवणूक केल्‍याशिवाय फसवणूक होऊ शकत नाही. या प्रकरणात 'यूपीएससी'ची फसवणूक झाली आहे. यावेळी त्‍यांनी पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षा कितीवेळा दिली याची माहिती देणारी कागदपत्रे न्‍यायालयासमोर सादर केली. वस्तुस्थिती लपवणे गंभीर नाही का? असा सवालही त्‍यांनी केला. नुसती तक्रार दाखल करून कारवाई सुरू होत नाही, असे मानले जाते. खटला चालवणे म्हणजे आरोपपत्र दाखल करणे आणि प्रकरणाची दखल घेणे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

पूजा खेडकर यांनी आपली वस्तुस्थिती अतिशय हुशारीने लपवली आणि युपीएससी परीक्षा दिली. २०२१ मध्‍येच पूजा खेडकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी विचारले गेले होते. मात्र त्‍यांनी ही प्रक्रिया थांबवली. यासाठी त्‍यांनी मानसिक आजाराचे कारण पुढे केले. आता त्‍या स्‍वत:ला बहुविध दिव्‍यांग म्‍हणत आहेत. त्‍या सातत्‍याने आपली भूमिका बदलत आहेत.न्‍याय म्‍हणजे सत्‍याचा शोध. या प्रकरणी सर्व पैलूंचा तपास करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळेच पोलीस कोठीडची मागणी करण्‍यात आली असल्‍याचेही सरकारी वकिलांनी स्‍पष्‍ट केले.

Pooja Khedkar
IAS Puja Khedkar | पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा! फेक रेशनकार्ड, घराचा पत्ताही निघाला चुकीचा

हा सर्व प्रकार युपीएससीचे अपयश आहे की अर्जदाराचे अधिक कौशल्‍य आहे ? न्‍यायालयाचा सवाल

या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्‍थेत आहे;मग तुम्‍ही अटक करण्‍याची घाई का करत आहात?हा संपूर्ण प्रकार हा युपीएससीचे अपशय आहे की, अर्जदाराचे अधिक कौशल्‍य आहे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे हे युपीएससीचे काम नाही का, असे सवाल न्‍यायालयाने केले. 'युपीएससी'च्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ॲड. कौशिक म्‍हणाले की, "नोकरीत रुजू झाल्‍यानंतर पूर्ववृत्त आणि चारित्र्य प्रमाणपत्र इत्यादींची पडताळणी केली जाते. प्रथमदर्शनी पडताळणी आणि छाननी हे 'यूपीएससी'चे काम आहे."

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : अखेर पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित

ही तर अपराधाची कबुलीच : ॲड. कौशिक

ॲड. कौशिक म्‍हणाले की, उमेदवाराने केवळ यूपीएससीसमोरच नव्हे तर न्यायालयांसमोरही कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. न्यायालयाच्या कोणत्या आदेशाने पूजा खेडकर यांना यूपीएससीच्या अनेक प्रयत्नांचा लाभ घेण्याचा अधिकार दिला? याबाबत अद्‍याप कोणतेही उत्तर आलेले नाही. तसेच संबंधित खटला विरोधात गेल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केलेले नाही. त्‍यांनी दिलेल्‍या खोट्या माहितीच्या आधारे हा प्रकार घडला. तुम्‍ही युपीएससी परीक्षा देताना नाव बदलले आहे. तुम्ही तुमच्या नावाचे स्पेलिंग कसे बदलता? त्‍यांनी केवळ स्‍वत:चेच नाव बदलले असे नाही तर पालकांची नावेही बदली आहेत. पालकांचे नाव बदलण्याचा अधिकार नाही. संबंधित उमेदवाराने कबूल केले आहे की, युपीएससीच्‍या पूर्वीच्या प्रयत्नांबद्दल सांगितले नाही. ही अपराधी कबुली आहे. हा प्रकार वैध उमेदवारांना रोजगार मिळण्यापासून वंचित ठेवणे आहे. युपीएससीच्‍या निवडीचे नियम स्‍पष्‍ट आहेत. संबंधित उमेदथवाराने सादर केलेली कागदपत्रांमधील माहिती खोटी आहे. UPSC कडे खटला चालवण्याचे साधन असेल तर ते खटला चालवेल. सखोल बुद्धिमत्तेचा वापर करून हा गुन्हा तिने केला आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्‍यांनी केली.

कायद्याचा आणखी दुरुपयोग होण्याची शक्यता

चौकशीच्या आधारे तपासाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. प्रथमदर्शनी कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. संबंधित व्यक्तीने कायद्याचा दुरुपयोग केला आहे हे सर्वांना माहीत आहे. तिच्याकडून कायद्याचा आणखी दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक आहे. अशा व्‍यक्‍तींना अटकपूर्व जामिनाचा लाभ मिळत नाही, असेही काैशिक म्‍हणाले.

Pooja Khedkar
Pooja Khedkar Case | घटस्फोट नावापुरताच? खेडकर दाम्पत्याविषयी चर्चा; संदिग्धता कायम

'युपीएससी'ची तक्रारीनुसार झाला हाेता गुन्‍हा दाखल

पूजा खेडकर यांच्‍या विरोधात दिल्ली पोलिसांनी शुक्रवार, १९ जुलै रोजी गुन्‍हा दाखल केला होता. मर्यादेपेक्षा जास्त वेळा परिक्षा देऊन आय़ोगाची फसवणूक केल्याप्रकरणी, तसेच खोटी ओळख सांगितल्याप्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) खेडकर यांच्‍याविरुद्ध तक्रार दिली होती. यानुसार हा गुन्‍हा दाखल झाला होता. युपीएससीने खेडकर यांची झालेली निवड रद्द करण्यासाठी आणि भविष्यात परीक्षा न देण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

तपासातून असे उघड झाले आहे की. पूजा खेडकर यांनी मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देऊन आय़ोगाची फसवणूक केली आहे. तसेच त्‍यांनी स्‍वत:चे नाव वडिलांची आणि आईची नावे, छायाचित्र/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी दाखवून परीक्षेचे नियमांचे उल्‍लंघन केले असल्‍याचे यूपीएससीने आपल्‍या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.

खेडकरांच्‍या वकिलांना युक्‍तीवादाची परवानगी

या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंदर कुमार जंगला यांच्यासमोर अटकपूर्व जामीन याचिकेवर २७ जुलै रोजी सुनावणी होणार होती. तक्रारदाराला सध्याच्या जामीन अर्जावर वकिलामार्फत युक्‍तीवाद करायचा आहे, असे यावेळी सांगण्‍यात आले. तक्रारदार पूजा खेडकर यांच्‍या वकिलांना युक्‍तीवादाची परवानगी देण्यात आली. तक्रारदाराला आक्षेप नोंदवण्याची मुभा आहे. त्‍यानुसार 30 जुलै रोजी जामीन अर्जावर युक्तिवाद होईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते. मात्र मंगळवार ३० जुलै रोजी न्‍यायालयाने बुधवारी सुनावणी होणार असल्‍याचे सांगितले.

Pooja Khedkar
Manorama Khedkar | मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पूजा खेडकरांनी आयएएस प्रशिक्षण केंद्राचीही 'डेडलाईन' धुडकावली!

वादाच्‍या भोवर्‍यात सापडलेल्‍या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी मसुरी येथील येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) हजर झाल्‍या नाहीत. आयएएस प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्‍याची अंतिम मुदत २३ जुलै होती. मात्र पूजा खेडकर यांनी हाही आदेश धुडकावल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते.

१६ जुलै रोजी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे प्रशिक्षण स्‍थगित करण्‍यात आले होते. त्‍यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले होते. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA)ने आपल्‍या पत्रात म्हटले होते की, पूजा दिलीप खेडकरचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्‍यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी त्वरित परत बोलावले होते. पूजा खेडकर यांनी नागरी सेवेत स्थान मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे. केंद्र सरकारने त्‍यांच्‍या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

पूजा खेडकरच्या आई-वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयात रुबाब दाखविणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे एक- एक कारनामे बाहेर आले. पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांनाच चक्क पिस्तूल दाखविले असल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर ५ जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसाात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सध्‍या मनोरमा खेडकर न्‍यायालयीन कोठडीत आहेत.

Pooja Khedkar
IAS Officer Pooja Khedkar|खेडकर दाम्पत्य बंगल्यात सापडलेच नाही

शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नाही

नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक अरविंद भोरे यांनी 'एएनआय' बाेलताना सांगितले होते की, पूजा खेडकर हिने २००७ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला, यासाठी तिला CET द्वारे प्रवेश मिळाला होता. तेव्हा तिने आरक्षणाची काही प्रमाणपत्रे दिली होती. यावेळी तिने जात प्रमाणपत्र, जात वैधता आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर केले होती. दरम्यान तिने फीटनेस सर्टिफिकेट देखील सादर केले होते. परंतु यामध्ये पूजा खेडकर या कोणत्याही प्रकारे शारीरीकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नसल्याची माहिती अरविंद भोरे यांनी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news