IAS Pooja Khedkar : अखेर पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित

महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त
Pooja Khedkar's IAS training on hold
वादाच्‍या भोवर्‍यात सापडलेल्‍या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्‍थगित करण्‍यात आले आहे. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वादाच्‍या भोवर्‍यात सापडलेल्‍या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्‍थगित करण्‍यात आले आहे. त्‍यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र खोटे केल्याप्रकरणी खेडकर यांच्यावर आरोप आहे. (Puja Khedkar's IAS training on hold)

खेडकर यांना अॅकडमीत परत बोलवले | Puja Khedkar's IAS training on hold

नितीन गद्रे, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या पत्रात असे लिहिले आहे की, "लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी यांनी एका पत्रात म्हटले आहे की पूजा दिलीप खेडकरचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्‍यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी त्वरित परत बोलावले आहे."

लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) च्‍या १६ जुलैच्या अधिकृत सूचनेनुसार, पूजा खेडकर यांना महाराष्ट्रातील प्रशिक्षण कर्तव्यातून मुक्त करण्यात आले आहे. त्‍यांना २३ जुलैपूर्वी मसुरी अकादमीत परत येण्यास सांगितले आहे. खेडकरांच्या नागरी सेवेत निवडीवरून वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. सेवेत स्थान मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली होती.

पूजा खेडकरच्या आई-वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयात रुबाब दाखविणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे एक- एक कारनामे बाहेर येत आहेत. पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांनाच चक्क पिस्तूल दाखविले असल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूजाची आई मनोरम खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर ५ जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसाात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

शारीरीकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नाही

नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक अरविंद भोरे यांनी 'एएनआय' बाेलताना सांगितले हाेते की, पूजा खेडकर हिने २००७ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला, यासाठी तिला CET द्वारे प्रवेश मिळाला होता. तेव्हा तिने आरक्षणाची काही प्रमाणपत्रे दिली होती. यावेळी तिने जात प्रमाणपत्र, जात वैधता आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर केले होती. दरम्यान तिने फीटनेस सर्टिफिकेट देखील सादर केले होते. परंतु यामध्ये पूजा खेडकर या कोणत्याही प्रकारे शारीरीकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नसल्याची माहिती अरविंद भोरे यांनी दिली आहे.

१० दिवसांत उत्तर द्या अन्यथा...,परवाना रद्द

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांना या प्रकरणी 10 दिवसांत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. या नोटीसमध्ये त्यांना या प्रकरणी 10 दिवसांत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. जर ती तसे करू शकली नाही तर तिचा बंदुकीचा परवाना रद्द केला जाईल, असेही त्यांनीही म्हटले आहे.

खेडकर यांचा व्हायरल व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील मुळशीतील

नुकताच आयएस पूजा खेडकरच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पूजा खेडकरची आई मनोरमा यांना शेतकऱ्यांशी संवाद साधताना पिस्तुल हलवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पूजा खेडकर शेतकऱ्यांशी बोलत असताना तिच्या हातात पिस्तूल दिसत आहे. यावेळी पूजाच्या आईसोबत काही बॉडी गार्डही होते. हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा शेतकऱ्याला दमदाटी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर पुजा खेडकर आणि कुटुंबिय वादाच्या भोवऱ्यात अडकले. दरम्यान तिच्या वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालय संचालक अरविंद भोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news