IAS Officer Pooja Khedkar|खेडकर दाम्पत्य बंगल्यात सापडलेच नाही

ग्रामीण पोलिसांचे पथक खेडकरांच्या बाणेरच्या घरी धडकले
Pooja Khedkar mother
खेडकर दाम्पत्य बंगल्यात सापडलेच नाहीFile Photo
Published on
Updated on

पुणे: शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सोमवारी सकाळी बाणेरमधील खेडकर यांच्या बंगल्यावर धडकले. (Pooja Khedkar)

Pooja Khedkar mother
IAS Pooja Khedkar | 'मीडिया ट्रायल'वरून मला दोषी ठरवू नका - पूजा खेडकर यांचे प्रत्युत्तर

मनोरमा खेडकर यांनी दाखवला होता पिस्तुलाचा धाक

मात्र, कारवाईची कुणकुण लागल्यामुळे खेडकर दाम्पत्य थांबले नसल्याचे आढळून आले. मनोरमा दिलीप खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नॅशनल हौसिंग सोसायटी, बाणेर), अंबादास खेडकर (रा. आंबी, ता. हवेली) यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खेडकर यांच्यासोबत शेतकऱ्यांना धमकाविण्यासाठी आलेल्या अंगरक्षकांविरुद्ध (बाऊन्सर) गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये महिला अंगरक्षकांचा समावेश आहे.

मुळशीतील घडवली गावात शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Pooja Khedkar)

Pooja Khedkar mother
IAS Officer Pooja Khedkar| पूजा खेडकरचे पाय खोलात!

पोलिसांच्या नोटीसला खेडकरांचा प्रतिसाद नाही

पोलिसांनी नोटीस बजावूनही प्रतिसाद न दिल्यामुळे खेडकर दाम्पत्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक सोमवारी बाणेरमध्ये गेले होते. मात्र, खेडकर कुटुंबीय पसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्यांच्या शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांना धमकाविल्याप्रकरणी खेडकर दाम्पत्यासह इतरांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना यासंदर्भात वारंवार फोन करून हजर राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ते हजर झाले नाहीत. सध्या त्यांचे फोन बंद असून, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.

अविनाश शिळीमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news