IAS Puja Khedkar | पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा! फेक रेशनकार्ड, घराचा पत्ताही निघाला चुकीचा

बनावट रेशनकार्डच्या आधारे मिळवले दिव्यांगत्व प्रमाणपत्र
IAS Puja Khedkar
पूजा खेडकर यांच्याबाबतीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (probationary IAS officer Puja Khedkar) यांच्याबाबतीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी चुकीचा पत्ता आणि बनावट रेशनकार्ड वापरून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले असल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

पूजा खेडकर यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र कोणत्या आधारे दिले गेले, ते दस्त सापडले आहे. त्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे. खेडकर यांनी प्लॉट क्र. ५३, देहू-आळंदी, तळवडे' ते यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) हॉस्पिटल हे त्यांचे पिंपरी-चिंचवडमधील निवासस्थान असल्याचा दावा केला आहे. मात्र, हा त्यांच्या घराचा पत्ता रहिवासी नसून बंद पडलेल्या थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा असल्याचे उघड झाले आहे.

IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : अखेर पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित

बनावट रेशनकार्ड केले तयार

तसेच या कंपनीच्या पत्त्याचा वापर करून खेडकर यांनी बनावट रेशनकार्ड तयार केल्याचेही कागदपत्रांवरून निष्पन्न झाले आले. ज्याचा वापर खेडकर यांनी अस्थिव्यंग (locomotor) दिव्यांगत्व असल्याचा दावा करून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केला. २४ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात त्यांना गुडघ्याचे सात टक्के दिव्यांगत्व असल्याचे नमूद करण्यात आले होते.

पूजा खेडकर यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागली हाती

पूजा खेडकर यांना दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र कोणत्या आधारे दिले, त्याचा दस्तावेज सापडत नसल्याने सुरुवातीला वेगवेगवेळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, सोमवारी संबंधित केसपेपरसह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रे अखेर हाती लागली. त्या प्रमाणपत्रांसह त्याच्याशी निगडित दस्तावेज जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या ताब्यात देण्यात आले.

IAS Puja Khedkar
Pooja Khedkar | पूजा खेडकर यांची कागदपत्रे सापडली

बंद पडलेल्या कंपनीच्या नावावर ऑडी कारची नोंदणी

याशिवाय त्यांनी थर्मोवेरिटा कंपनीच्या नावावर ऑडी कारची नोंदणी केली. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कर संकलन विभागाच्या माहितीनुसार, या कंपनीने गेल्या तीन वर्षांपासून २ लाख ७७ हजार रुपये रक्कम थकीत आहे.

दिलीप खेडकर यांचीही चौकशी

दरम्यान, पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालमत्तांबाबतचा सविस्तर अहवाल मंगळवारी सायंकाळी राज्याच्या मुख्यालयाकडे सादर केला. दिलीप खेडकर यांनी २०२० मध्ये निवृत्त होईपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) संचालक म्हणून काम केले. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar | 'मीडिया ट्रायल'वरून मला दोषी ठरवू नका - पूजा खेडकर यांचे प्रत्युत्तर

पूजा खेडकर यांच्यावर काय आहेत आरोप?

तर पूजा खेडकर यांच्यावर बनावट प्रमाणपत्रांसोबतच व्हीआयपी मागण्यांसाठी अधिकाराचा गैरवापर करणे आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावणे यासारखे गंभीर आरोप आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्याबाबत अहवाल सादर केला होता. त्यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली.

IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar | पूजा खेडकर कोण आहेत? त्यांची बदली का झाली?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news